कोरोनाच्या भीतीने इंग्लंडमध्ये तरुण मुलांनी  सोडलं स्मोकिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:31 AM2020-07-23T09:31:49+5:302020-07-23T09:33:06+5:30

इंग्लंडमध्ये तरुण मुलं मोठय़ा प्रमाणात स्मोकिंग सोडत आहेत, अमेरिकेतही अभ्यासक सतत सांगत आहेत की, जे सिगारेट ओढतात त्यांना कोरोनासंसर्गासह जिवाला धोका मोठा आहे..

In England, millions of young are quitting smoking, | कोरोनाच्या भीतीने इंग्लंडमध्ये तरुण मुलांनी  सोडलं स्मोकिंग!

कोरोनाच्या भीतीने इंग्लंडमध्ये तरुण मुलांनी  सोडलं स्मोकिंग!

Next
ठळक मुद्देकोरोनाकाळात व्यसन जिवावर बेतू शकतं !

-नितांत महाजन

सतत धूम्रपानाचा आणि कोविड-19चा संसर्ग होण्याचा काही परस्पर संबंध आहे का?
याचा अभ्यास आता इंग्लंड आणि अमेरिकेत अनेक संस्था, विद्यापीठं करत आहेत. महामारीच्या सुरुवातीच्या काळात, विशेषत: युरोपात जे कोरोनाबळी जात होते त्यांच्यात वृद्धांची संख्या मोठी होती. त्यामुळे चर्चा अशीही होती की, तरुणांना या आजाराचा फार धोका नाही.
प्रत्यक्षात नंतर आलेल्या आकडेवारीने हे स्पष्ट केलं की, तरुणांनाही मोठय़ा प्रमाणात संसर्ग होत आहे, आणि दगावणा:यांत तरुणांचं प्रमाणही वाढत आहे.
हाच ट्रेण्ड भारतीय उपखंडातल्या देशातही दिसला.
याचकाळात इंग्लंड सरकारने देशभरातल्या युवकांना सल्ला दिला की, धूम्रपान सोडा. जे तरुण धूम्रपान करतात त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे.
त्याचा परिणाम म्हणून आणि वाढती बळींची संख्या समोर असल्याने इंग्लंडमध्ये अलीकडच्या काळात 1 मिलिअन तरुणांनी स्मोकिंग सोडल्याची माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे वृद्धांपेक्षाही 16 ते 29 या वयोगटातील तरुणांचं स्मोकिंग सोडण्याचं प्रमाण जास्त असल्याचं आकडेवारी सांगते.


अॅक्शन ऑन स्मोकिंग अॅण्ड हेल्थ ही संस्था आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन यांनी अलीकडेच एक सर्वेक्षण केलं. त्यात त्यांना असं आढळलं की, आपण धूम्रपान करत राहिलो तर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अर्थात हायरिस्क कॅटेगरीत आपण जातो याची जाणीव ठेवून अनेक ांनी धूम्रपान सोडलं. मात्र त्यातही तरुणांची संख्या जास्त आहे.
धूम्रपान ही ब्रिटनमध्ये मोठी समस्या आहेच.
त्यात कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झालं. आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉलने केलेल्या सर्वेक्षणानुसार आणि लंडनमधल्या कोविड ट्रॅकरच्या नोंदीनुसार असं आढळून आलं की, लॉकडाऊन झालं त्याकाळात अचानक अनेक तरुणांनी स्मोकिंग सुरूतरी केलं किंवा त्याचं प्रमाण तरी वाढवलं. याकाळात देशात 2.2 मिलिअन स्मोकर्स वाढले असं या सव्र्हेची आकडेवारी सांगते.
त्यांचं म्हणणं आहे की, सिगारेटी ओढू नये हे अनेकांना कळतं मात्र याकाळात अचानक आलेल्या किंवा वाढलेल्या एकटेपणामुळे अनेकांनी स्मोकिंग सुरूकेलं. एकटेपणा, एकाकीपणा इतका की जितकं जास्त एकटेपण तितकं धूम्रपानाचं प्रमाण जास्त. म्हणून इच्छा असूनही अनेकजण हे व्यसन सोडू शकलेले नाहीत.
हे असं असलं तरी या महामारीच्या काळात तरुण मुलं व्यसनांपासून दूर जात आहेत, त्यातून त्यांना आपली जीवनशैली उत्तम असावी असं वाटू लागलं आहे ही एक सकारात्मक गोष्ट आहे.
अर्थात व्यसनं सोडली तर.  नाहीतर धोका अटळ आहेच. 

****

स्मोकिंग करताय मग तिनात  एकाला धोका


अमेरिकेतही युनिव्हर्सिटी  ऑफ कॅलिफोर्निया आणि 
सॅन फ्रॅन्सिस्को यांनी  18 ते 25 या वयोगटातील तरुणांचा अभ्यास केला. त्यांचंही म्हणणं हेच आहे की, या वयात जे मुलंमुली सिगारेट ओढतात त्यांना इतरांपेक्षा कोविड-19चा धोका इतरांपेक्षा (म्हणजे व्यसन न करणा:यांपेक्षा) अधिक आहे. त्यात सिगारेटच नाही तर इ सिगारेट पिणारे, अन्य तंबाखूजन्य किंवा मादक पदार्थ सेवन करणारेही आहेत. त्यात असे दिसते की व्यसन करणा:या दर तीन तरुणांत एकाला कोविडचा गंभीर धोका आहे. अमेरिकेच्या नॅशनल हेल्थ इंटरव्ह्यूमधून ही आकडेवारी समोर येते आहे.

24 ते 34 या वयोगटातही जे स्मोकर्स आहेत, त्यांना अधिक गंभीर धोका संभवतो असं अमेरिकेत फ्लोरिडाचा सीडीसी सव्र्हे सांगतो.

 

Web Title: In England, millions of young are quitting smoking,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.