शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पीसीओडी या आजाराकडे दुर्लक्ष करून कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 03:00 IST

वजन वाढलंय,पाळी अनियमित येते? चेह-यावर खूप पिंपल्स आहेत? मग सावधान.

 

-डॉ. यशपाल गोगटे 

भारतानं गेल्या काही वर्षांत साथीच्या आजारांवर  नियंत्रण मिळवलं. कॉलरा, देवी यावर नियंत्रण येत आहे, पोलिओ नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी मोहीम राबवली गेली; पण त्याचबरोबर काही वेगळेच आजार डोकं वर काढत आहेत. जसं की पीसीओडी, कॅन्सर, डायबेटिस इत्यादी.

गेल्या काही काळात एक आजार सर्रास ऐकायला येतो. तो आजार सेक्स हार्मोन्सशी निगडित आहे. त्याचं नाव पीसीओडी.  पॉली सिस्टिक ओवॅरियन डीसीज. या आजारानं होणारे त्रास तो होण्याची कारणं आणि परिणाम याविषयी या आठवड्यात आपण तपशिलात बोलू.

आपल्या शरीरात तीन सेक्स हार्मोन्स मुख्यत: कार्य करतात. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन व टेस्टोस्टेरॉन. यातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील प्रमुख हार्मोन्स आहेत व टेस्टोस्टेरॉन हे पुरु षत्वाचं हार्मोन आहे. सामान्यत: स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन अधिक असतं व टेस्टोस्टेरॉन अत्यल्प असतं. या उलट पुरु षांमध्ये टेस्टोस्टेरॉन जास्त असतं व इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन अत्यल्प असतं. पण काही कारणास्तव स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण मात्र वाढलं तर त्याला हार्मोनल इम्बॅलन्स असं म्हणता येईल. या हार्मोन इम्बॅलन्सचं मुख्य कारण असलेला आजार म्हणजे हा पीसीओडी.सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास पीसीओडी या आजारामध्ये स्त्रियांमध्ये पुरु षत्वाचे हार्मोन म्हणजेच टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं. या आजारामध्ये बीजांडात छोट्या-छोट्या अनेक गाठी (पॉली) तयार होतात ज्याला सिस्ट असं म्हटलं जातं. गळ्यात मोत्याची माळ असावी तशा या सिस्ट एकाशेजारी एक गुंफलेल्या असतात. सोनोग्राफीने या सिस्टचं निदान होऊ शकते. इतर गाठींपेक्षा या सिस्टचं वैशिष्ट्य म्हणजे या आपोआप कमी जास्ती होत असतात. वयाच्या पस्तीशी नंतर बरेच वेळा या सिस्ट आपोआप कमी होतात व काही प्रमाणात आजार बरा होतो.

पीसीओडी हा आजार नक्की का होतो याचं एक कारण नसून अनेक कारणं आहेत; पण काही व्यक्तींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. आनुवंशिकता हे एक मुख्य कारण म्हणता येईल. जन्मत: कमी वजन असणार्‍या मुलींमध्ये हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.  या आजाराचं डायबेटिसशी खूप जवळचं नातं आहे. ज्या कुटुंबांमध्ये डायबेटिसचे प्रमाण जास्त असतं त्यातील मुलींना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. वाढलेलं वजन व लठ्ठपणादेखील याचं एक कारण आहे. त्यामुळे आयुष्यामधील तीन वेगळ्या टप्प्यांमध्ये पीसीओडी होण्याची शक्यता अधिक असते. हे टप्पे म्हणजे पौगंडावस्था, गर्भधारणा व मेनोपॉज हे होय. कारण या काळात झपाट्यानं वजनाची वाढ होत असते. काही विशिष्ट हार्मोनच्या आजारांमुळेदेखील पीसीओडी होऊ शकतो जसे थायरॉइड, अ क्रोमेगाली कुशिंग इ. 

पीसीओडी या आजाराची काही विशिष्ट लक्षणं असतात. पाळीचे विकार - म्हणजे पाळी उशिरा येणं, अनियमित असणं, मधेच स्पॉटिंग होणं हे यात होऊ शकते. या आजारात पाळी अनियमित होत असल्यानं ते वंध्यत्वाचं कारण ठरू शकतं. 

पुरुषार्थाचे हार्मोन टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढल्यामुळे देहयष्टीत पुरुषाप्रमाणे बदल होतात, जसे डोक्यावरचे केस कमी होणं, चेह-यावर, अंगाखांद्यावर केस वाढणं. आवाज घोगरा होणं, पिंपल्स व तारु ण्यपिटिका होणं. बरेच वेळा हे पिंपल्स अधिक तीव्र व त्वचेवर डाग व व्रण पाडणारे असतात. शरीरातील या हार्मोन इम्बॅलन्स मुळे मानसिक ताणतणाव वाढतो व नैराश्य, चिडचिडेपणा याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे पीसीओडीची शंका आल्यास लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं.