शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

मॉल अंगावर येतो?

By admin | Updated: October 2, 2014 18:44 IST

शॉपिंग म्हटलं की अनेकांच्या अंगात संचारतंच.मॉलरॅटच असतात काहीजण. तोंडपाठ असतं त्यांना काय घ्यायचं काय नाही ते!

- प्राची खाडे
(स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर)
 
शॉपिंग म्हटलं की अनेकांच्या अंगात संचारतंच.
मॉलरॅटच असतात काहीजण. तोंडपाठ असतं त्यांना काय घ्यायचं काय नाही ते! मात्र बहुतेकजण मॉलमधे खरेदीला गेलं की मनातल्या मनात बिचकलेलेच असतात. त्या लखलखाटात नेमकं काय घ्यावं, आपल्याला नेमकं काय चांगलं दिसेल हेच कळत नाही. गांगरायला होतं. आणि जे घ्यायचं नसतं ते ही घेऊन अनेकजण घरी येतात.
असं होऊ नये म्हणून या काही आयडिया, ज्या लक्षात ठेवल्या तर तुमचं मॉलशॉपिंग एकदम ‘खास’ होऊन जाईल.
 
लिस्ट केलीये?
खरेदीला निघण्यापूर्वी आपल्याला जे काही खरेदी करायचं आहे त्याची एक यादी केलेली बरी! तुम्ही म्हणाल हे काय बेसिक सांगता ? पण हेच खरंय, अनेकजण मॉलमध्ये जाताना अजिबात यादी करत नाहीत. मग घोळ होतो, त्यामुळे जुनाट वाटेल पण हाताशी यादी ठेवाच, आपल्याला नक्की काय करायचंय याची एक यादी हाताशी ठेवाच. 
 
घ्यायचंय नक्की काय?
शॉपिंग लिस्ट तयार झाली की वस्तुंची त्यांच्या स्वरूपानुसार विभागणी करा.
म्हणजे शूज घ्यायचेत एवढंच लिहून थांबू नका, तुम्ही जर ठरवलं असेल की पांढरे शूज घ्यायचेत, सिल्व्हर पार्टीवेअर घ्यायचेत. पॅट्स घ्यायच्यात आहेत, त्याही कॅज्युअल तर तसं लिहून ठेवा. एवढय़ा गर्दीत आपल्याला हवं ते शोधणं मग सोपं होतं. आधी आपली गरज काय, ते नक्की ठरवा.
बी कम्फर्टेबल 
हेदेखील पुन्हा बेसिकच. पण चूक नेमकी इथंही होतेच. खरेदीला निघताना नेहमीच आरामदायी कपडे आणि चप्पल घाला. विशेषत: मुलींनी. सहज बदलता येईल असा कुर्ता-चुडीदार किंवा टॉप-लेंगिन्स असे कपडे घाला. त्यामुळे खरेदी करताना नवीन ट्राय करणं सोपं होतं. त्यात वेळ जात नाही. मॉलमधे खूप चालावं लागतं, त्यामुळे पाण्याची बाटली, काहीतरी च्याऊमाऊ बरोबर ठेवलेलं बरंच. 
 
मार्केट सर्व्हेचा मोह
कुठं काय मिळतं, हे नको ते, असं म्हणत तंगडतोड करत फिरण्याचा मोह अनेकांना होतो. काय घ्यायचं हे नक्की नसल्यानं ते शोधत फिरतात. पण त्यात वेळ तर जातोच, कनफ्यूजन वाढतं. ट्राफिकमधे अडकायला होतं ते वेगळंच. त्यापेक्षा एकच मोठं मार्केट, मॉल असं ठरवून एकाच ठिकाणी शॉपिंग करा. अतिचोखंदळपणा केला तर जे घ्यायचं तेच राहून जातं. पण जर तुम्ही खरेदीसाठी संपूर्ण दिवस ठेवला असेल तर त्यातील संपूर्ण वेळेच्या केवळ 30 टक्के वेळेत फिरफिर  करा. कुठं काय मिळतं ते पहा. विंडो शॉपिंग करून बाजारातील किंवा मॉलमधील आपल्याला खरेदी करावयाच्या वस्तुंच्या किमतीचा अंदाज घ्या. मग लागा खरेदीला.
 
ट्रायल्स 
कपडे आणि चपलांची खरेदी करणार असाल तर त्याची ‘ट्रायल’ घ्याच.  साईझ वा फिटिंगबाबत तुम्हाला कितीही खात्नी असेल तरीही निरनिराळ्या ब्रँडसनुसार साईझ आणि फिटिंग बदलत असते. जर तुम्ही ट्रायल्स घेणं टाळलं तर घेतलेली वस्तू बदलण्याकरिता चकरा माराव्या लागतील. कुणास ठाऊक नंतर पुन्हा त्या दुकानात तुमच्या मापाचे कपडे, तुम्हाला आवडले तसेच मिळतील की नाही ! त्यामुळे ट्रायल घ्या. आवडलेले कपडे दुकानातच घालून पहा. ते तसे घालण्याचा अनेकांना फार कंटाळा येतो. त्यातून मग पुढे पस्तवावं लागतंच.