शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जे आपण करु शकतो, ते तरी आपण करतोय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:00 IST

जे हातात नाही त्यासाठी रडण्यापेक्षा जे हातात आहे, त्याचं आपण काय करतो?

- विकास बांबल 

कॉलेजमध्ये सर वर्गात शिकवत असताना घडलेला किस्सा. ज्यामुळे मला खूप मोठी शिकवण मिळाली.बिझनेस मॅनेजमेण्ट या विषयाचा क्लास चालू होता. माझा आवडता विषय. सरसुद्धा छान तल्लीन होऊन शिकवत होते. थोडय़ाच वेळात वर्गाच्या खिडकीतून बाहेरचे हसण्या-खिदळण्याचे आवाज ऐकायला आलेत व मोबाइलवरची गाणीसुद्धा ऐकू येऊ लागली. त्या  आवाजामुळे संपूर्ण वर्ग डिस्टर्ब झाला.सर तसेच तडकाफडकी खिडकी जवळ गेलेत. खिडकीतूनच डोकावून पाहत गाणी वाजवणार्‍या मुलांना विनंती केली, ‘अरे मुलांनो, येथे गाणी वाजवू नका.’ सरांच्या बोलण्यावर मुलांनी गाणी लगेच बंद केलीत आणि सर पुन्हा शिकवायला लागलेत. मग पुन्हा पाच-दहा मिनिटांनी गाण्यांचा आवाज ऐकायला येऊ लागला. सरांनी पुन्हा एकदा संबंधितांना विनंती केली, कृपया येथे गाणी वाजवू नका. क्लास चालू आहे.पण ह्यावेळी गाणी बंद झाली नाहीत उलट बाहेरून हसण्याचे आवाज आलेत. तेव्हा सरांनी नाइलाजाने ती खिडकी पूर्णपणे बंद करून घेतली. त्यामुळे ऐकू येणार्‍या आवाजाची तीव्रता बरीच कमी झाली. मग सरांनी आपला आवाज थोडा वाढवत आम्हाला शिकविण्यास सुरुवात केली.तेव्हा सरांनी एक गोष्ट सांगितली होती. आजही ती स्मरणात आहे.सर म्हणाले, मी प्रयत्न करूनही मुलांनी गाणी बंद केली नाहीत, पण मी ही खिडकी बंद करू शकत होतो जे माझ्या हातात होते ते मी केले. दुसर्‍यानं काय करायला पाहिजे यापेक्षा मी काय केलं पाहिजे, माझ्या हातात कुठला पर्याय आहे याचा विचार आपण करायला हवाय.ही गोष्ट छोटी असली तरी सुखी आणि समाधानी जीवन जगण्याचा मंत्न देणारी आहे.आयुष्यात बर्‍याच गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या आपल्या हातात नसतात याच गोष्टीची सल आयुष्यभर आपण बाळगतो त्यामुळे बरेचदा दुर्‍खच आपल्या वाटय़ाला येते.  याउलट माझ्याकडे काय आहे? याचा मी जीवन सुंदर करण्यासाठी कसा उपयोग करून घेऊ शकतो?  हा विचार प्रत्येकाने केल्यास दुर्‍खाचा भार तेवढाच कमी करता येईल.जेवढा सकारात्मक विचार करून आपल्याला जगता येईल तेवढे आपणच स्वतर्‍ आनंदी राहू. नकारात्मक विचार वेदनेशिवाय काही देत नाही. नेहमी आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा पुरेपूर उपयोग करून घेता आला पाहिजे. आपल्या हातात अमुक गोष्ट नाही म्हणून मन लहान करून घेऊ नये. जे आपल्या हातात आहे त्यावर समाधान व्यक्त करा. आणि प्रयत्न करीत राहा.आयुष्याचा प्रवास करताना जे आपल्या हातात नाही त्याचा शोक करीत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद घेत उपयोग करून घेणं महत्त्वाचं.आपण आपल्या हाती कण्ट्रोल घेतलेला बरा.