शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमभंग झालाय, वजन वाढू शकतं.

By admin | Updated: April 25, 2017 16:15 IST

प्रेमभंगाच्या इमोशनल घोळात एक केमिकल लोचा शरीरातही होवू शकतो.

- चिन्मय लेले
 
प्रेमभंग.
या विषयात जेवढं लिहू तितकं कमीच.
आणि कितीही लिहा, त्यातला दर्द काही व्यक्त होत नाही.
किंवा कुणी वाटूनही घेवू शकत नाही.
मात्र प्रेमभंगाच्या या सार्‍या इमोशनल लोच्यात एक केमिकल लोचा शरीरातही होवू शकतो. त्याकडे मात्र कुणी लक्ष देत नाही.
वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रानं अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार आता तरुण मुलांमध्ये एक नवीन ट्रेण्ड दिसतो आहे.
त्या ट्रेण्डचं नाव आहे ब्रेकप गेनर!
म्हणजे काय तर प्रेमभंग झाल्याच्या दुर्‍खात अनेकजण खात सुटतात. जंकफूड खातात. कोल्डड्रिंक पितात. बोअर झालं की चॉकलेट खातात. चहा-कॉफी पितात. त्यानं आपल्या मेंदूला तरतरी येईल असं त्यांना वाटतं.
मात्र मेंदू तसाच जड असतो होतं एवढंच की, त्यामुळे शारिरीक वजन वाढत जातं. त्या वजनानं हार्मोनल घोळ होतात. विशेषतर्‍ मुलींमध्ये. पाळीचे प्रश्न वाढतात. त्यातूनही वजन वाढतं.
आणि मग एकामागून एक चक्र सुरुच राहतं. परिणाम तोच.
वजन वाढ.
त्यातून येणारं डिप्रेशन.
आपल्या रंगरुपाचे प्रश्न.
आणि त्या नैराश्यातून अधिक खाणं हे सारं चक्र अनेक तरुण मुलांमध्ये दिसतं.
प्रेमभंग राहतो बाजूलाच शरीराची वाताहात सुरु होते.