शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

थांबलो नाही म्हणून जगलो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 07:00 IST

गाव सोडलं, संकटं आली, फसवणूक झाली; पण संघर्ष थांबवला नाही.

ठळक मुद्देनवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. त्यातून आपण शिकत जातो.

विठ्ठल देवकर

मी सोलापूर जिल्ह्यातल्या लऊळ या छोटय़ाशा गावचा. घरची परिस्थिती खूपच हालाखाची जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून वडिलांसोबत आठवडा बाजारात चुना  (पान  तंबाकू खायचा) विकायला जायचो. उन्हाळी आणि दिवाळी सुटय़ांमध्ये वडिलांना मदत करायला, चुनखडी गोळा करायला जायचो. अशा परिस्थितीत शिकलो, दहावी झालो. आम्ही दोघं भाऊ. मी धाकटा. आईला नेहमी वाटायचं माझ्या एकातरी पोरानं शिकलं पाहिजे. त्यात भावकीचा खूप त्नास. मग वडिलांनी ठरवलं पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी टाकायचं. म्हणून अकरावी-बारावीसाठी अकलूजला शिकायला पाठवलं. पहिलं वर्ष खडतर गेलं; परंतु प्रसंगांना एकटय़ानं धीरानं तोंड देत गेलो. बळ मिळत गेलं. नंतर मागे वळून पाहिलं नाही. बारामतीमध्ये बीएस्सी, कम्प्युटर सायन्स केलं.एमएस्सी करायला पुण्यात आलो. त्याच काळात एका मित्नानं सांगितलं तुला कसबा पेठमध्ये रूम मिळवून देतो; पण एका महिन्याचं भाडं इस्टेट एजंटला द्यावं लागेल. नंतर कळलं तो त्याचा मोठा भाऊ होता, इस्टेट एजंट पण नव्हता. त्यांनी मला फसवलं. फार वाईट वाटलं. त्याच काळात फार वाईट दिवस अनुभवले. पण त्यातूनही शिकलो, तरलोच.आता मी एका नामांकित बहुराष्टीय कंपनीत उत्तम पदावर काम करतो आहे. अजून पुण्यात स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला भेटणारी सगळीच माणसं चांगली असतात असं नाही. नवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. त्यातून आपण शिकत जातो. संघर्ष करतो आणि त्याला मेहनतीची जोड देतो. प्रवास सुरूच ठेवतो.