coronavirus : टाळेबंद तारुण्य-जगभरातले तरुण लॉकडाउनमध्ये काय करत आहेत? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 07:00 AM2020-04-23T07:00:00+5:302020-04-23T15:37:18+5:30

संपूर्ण जग, आपला देश लॉकडाउनमध्ये आहे. तरुण मुलं मोबाइलवर टिकटॉक करत, फॉरवर्ड खेळात नाक खुपसून बसलेत; पण जरा मान वर करा, क्षणभर विचार करा आणि विचारा स्वत:ला, की घरात वीज, हा मोबइल आणि त्यावरचा डेटा पॅक नसेल तर मी कोण आहे? मला काय करता येते? काय करता येत नाही? मी स्वत:ला, माझ्या  कुटुंबीयांना आणि समाजाला कसा उपयुक्त ठरू शकतो? खरंच उपयुक्त ठरूशकतो का? एरव्ही हे प्रश्न कदाचित कधी तुम्ही स्वत:ला विचारलेही नसते; पण लॉकडाउनचा काळ सरताना विचारा. कारण त्यातून जी उत्तरं हाती येतील त्यावर तुमचं आणि या देशाचंही भवितव्य अवलंबून आहे. तरुणांच्या हातातला मोबाइल जाऊन तिथे स्क्रू-ड्रायव्हर्स, मायक्रो प्रोसेसर्स, सोल्डरिंग गन्स, विळा,कात्री, टेस्ट-टय़ूब्ज, शाईपेन, आणि ड्रील मशीन्स आले तरच हा देश नव्यानं भरारी घेईल... नाहीतर..?

coronavirus: youth all over the world - how life affected by lockdown? what will change permanently fot them.. | coronavirus : टाळेबंद तारुण्य-जगभरातले तरुण लॉकडाउनमध्ये काय करत आहेत? 

coronavirus : टाळेबंद तारुण्य-जगभरातले तरुण लॉकडाउनमध्ये काय करत आहेत? 

googlenewsNext
ठळक मुद्देआणि भारतीय तरुण.? त्यांचं काय? ते काय करत आहेत?

- राहुल बनसोडे

जगभरातल्या तरु णाईसाठी या वर्षाची सुरु वात तशी रडतखरडतच झाली होती. 
2020 हा आकडा जादुई होता खरा. या आकडय़ांचे टायटल बनवून जगभरातल्या अनेक युवकांना स्वप्ने दाखवली गेली होती. 
पण, जसजशी जानेवारीची 1 तारीख जवळ येऊ लागली तसतशी परिस्थिती त्या स्वप्नांच्या आसपासही फिरकत नाहीये असे दिसू लागले. 
शिक्षण, करिअर, स्ट्रगल, नाती, पैसे या सगळ्या गोष्टी मागच्या पानावरून पुढच्या पानावर ढकलल्या जात होत्या. अनेक देशांमध्ये बेरोजगारीची समस्या आणखी थोडी तीव्र झाली होती, गरिबी आणि श्रीमंतीतली दरी वाढत होती. या दरीत एक दिवस सगळा समाजच बुडून जाऊ शकतो असं मत काही शास्त्नज्ञ व्यक्त करीत होते. 
अर्थात, जगभरातले निम्म्याहून अधिक तरु ण अजूनही आईवडिलांसोबतच राहात होते, ज्यांच्या आईवडिलांकडे पैसे होते त्यांना स्वत: कमावते नसूनही आपण गरीब आहोत असे कधी वाटले नव्हते, काहींना तर शिक्षणाचे किंवा जॉबचे फारसे टेन्शनही नव्हते. ज्युनिअर कॉलेजला जाणारी मुले फस्ट इअरला कुठले विषय घ्यावेत याविषयी चर्चा करीत होते, तर ग्रॅज्युएशनला असणारी मुले पोस्टग्रॅज्युएशन कुठल्या स्पेशॅलिटीत करायचे हे ठरवत होते. ज्यांचे पोस्टग्रॅज्युएशन पूर्ण होण्याच्या मार्गावर होते त्यांनी इंटर्नशिपसाठी प्रयत्न सुरू केले होते. पोस्टग्रॅज्युएशन पूर्ण करूनही व्यवस्थित नोकरी न लागलेला एक मोठा वर्ग स्ट्रगल करत होता. नव्याने पसरत चाललेल्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये पडेल ते काम करून दिवस ढकलणो चालू होते. काहींना पैशांची प्रचंड गरज होती, त्यामुळे मिळेल ते काम करण्याची त्यांची तयारी होती. काहींना पैशांची तशी फारशी फिकीर नव्हती. त्यामुळे मनासारखे काम शोधण्यात त्यांचा वेळ जात होता. दिवस त्यांच्या नियमाप्रमाणे जात होते. मनात हजार अपेक्षा होत्या आणि सोबत होता स्मार्टफोन. निरनिराळ्या ग्रुप्समध्ये मीम्सचा वर्षाव सुरू झाला होता, अगदी कुठल्याही गोष्टीकडे खवचट विनोदी पद्धतीने पाहिले जात होते. जगात घडणाऱ्या कुठल्याही घटनेतला विनोद शोधून त्यावर टिकटॉक्स बनवले जात होते. व्हॉट्स अँपवर नेहमीची भंकस इकडून तिकडे ढकलली जात होती. 
हे सगळं असं सुरूच होतं.
आणि मग सुरू झाला कोरोनाचा कहर. 
त्या काळात जगभरातले तरुण कसे वागले? कसं वागत आहेत?
आणि त्यातून त्यांचा देश घडेल की बिघडेल? - हे शोधणारा हा प्रवास

चीन

आजवर कधी नावही न ऐकलेल्या चीनच्या वुहान शहरात कोरोनाने डोके वर काढले आणि त्याने संपूर्ण शहराला आपल्या विळख्यात घ्यायला सुरु वात केली. हळूहळू चीनमधून बाहेर प्रवास करणारे लोक परतताना आपल्या देशांत साथीचा विषाणू सोबत घेऊन गेले. जानेवारीच्या शेवटच्या दिवसात एकटय़ा वुहान शहरात अकरा हजारहून अधिक लोक कोरोनाग्रस्त झाले आणि इन्फेक्शनशी लढा देताना 298 रु ग्णांना मृत्यू पत्करावा लागला. अवघ्या एका महिन्यात चीनचे वातावरण अंतर्बाह्य बदलून गेले. समस्या इतक्यात आंतरराष्ट्रीय झाली नसली तरी चीनमधल्या स्थानिक लोकांमध्ये सरकारबद्दल रोष पसरू  लागला. या नव्या रोगाच्या धोक्याबद्दल सर्वात अगोदर आवाज उठवणाऱ्या डॉक्टरची मुस्कटदाबी करण्यात आली आणि त्यामुळे समस्या व्यवस्थित समजून येण्यात प्रचंड उशीर झाला. या सगळ्या प्रकारामुळे सर्वात अस्वस्थ झाला तो चीनी तरुण. 
एरव्ही विद्याथ्र्यानी राजकारणात न पडता अभ्यासात लक्ष द्यावे अशी चीनच्या सरकारची अपेक्षा होती, सरकार जोवर लोकांच्या हितासाठी काम करते आहे तोवर उगीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा देण्याची चीनी तरुणांना गरजही वाटत नव्हती; पण या मुस्कटदाबीमुळे आपले आयुष्यच धोक्यात आले आहे असे वाटून चीनी तरु ण बिथरला. सर्वात पहिल्यांदा या तरु णांनी आरोग्यासाठी लढणाऱ्या कर्मचाऱ्याना आणि डॉक्टर्सना पै पै करून जमवलेले पैसे दिले. आरोग्यसेवेतल्या लोकांना कुठलीही कमतरता भासणार नाही याबद्दल प्रयत्न केले आणि त्यानंतर तरु णांची एक आख्खी पिढी संघर्षात उतरली. सरकार जी माहिती दाबू पाहते आहे ती माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांकडे लीक केली जाऊ लागली. चीनमधले इंटरनेट हे कमालीचे बंदिस्त आहे आणि तिथे सरकारविरोधातल्या कुठल्याही मजकुराची गय केली जात नाही. इतकेच काय चीनमध्ये व्हॉट्स अँप, फेसबुक वा ट्विटरदेखील ब्लॉक आहे. तरु णांनी सगळ्यात पहिल्यांदा मोर्चा वळवला या सव्र्हिसेसकडे आणि हॅकिंग व व्हीपीएन तंत्नाचा वापर करून त्यांनी या सेवांवरती चीनमधली खरी-खोटी परिस्थिती कथन करण्यास सुरु वात केली. चीनमध्ये तीस वर्षापूर्वी झालेल्या विद्यार्थी लढ्यातले लोक आता पन्नाशी-साठीकडे झुकू लागले आहेत, विद्यार्थी लढ्याच्या त्यांच्या आठवणी आताशा पुसट झाल्या आहेत. सध्या चीनमध्ये जे काही सुरू आहे त्याला विरोध करणारी पूर्णत: नवी पिढी तयार झाली असून, या पिढीच्या आकांक्षा आता पूर्ण झाल्या नाहीत तर कुठल्या अशांत परिस्थितीला चीनला सामोरे जावे लागेल याबद्दल लगेच काही सांगता येणार नाही.

 

इटली
दरम्यान वुहान या शहरात शिक्षणानिमित्त वा कामधंद्यानिमित्त स्थायिक झालेले लोक आपापल्या मायदेशी परतू लागले होते. ज्यात इटलीतल्याही दोघा-तिघांचा समावेश होता. फेब्रुवारीच्या दुसऱ्याआठवडय़ार्पयत इटलीतल्या तरुणांची अवस्था बरीचशी इतर देशांतल्या तरु णांसारखीच होती. सरकारने नुकतीच बेरोजगारीसंदर्भात आकडेवारी जाहीर केली होती. ज्यात पूर्ण इटलीतले 4 टक्के लोक बेकार असल्याचे सांगण्यात आले होते, तर तरु णांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे 8 टक्के इतके कमी आहे असे मांडण्यात आले होते. जमिनीवरची परिस्थिती सरकारी आकडय़ांपेक्षा बरीच वेगळी होती. युरोस्टॅटने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार हा आकडा 28 टक्क्यांहूनही जास्त असायला हवा होता, कारण इटलीत दर तीन तरु णांमधला एक तरु ण बेरोजगार होता. इटलीची अर्थव्यवस्था खाली सरकली नव्हती तशी ती वरही सरकत नव्हती. या जैसे थे अवस्थेत कोंडून पडल्याने गेल्या दशकभरात वीस लाखांहूनही अधिक तरु ण इटली सोडून युरोपातल्या इतर देशांमध्ये तर काही अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. युरोप आणि अमेरिकेत संधी उपलब्ध  असल्याने बेरोजगार तरु णांचा सरकारविरोधात सूर फार तिखट नव्हता; पण त्यात शांतताही नव्हती. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात  मात्र  इटलीमधली स्थिती वेगाने बदलू लागली. तिथं कोरोनाने मांडलेला उच्छाद वुहानलाही मागे टाकू लागला. कोरोनामुळे शेकडो लोक रोज मृत्युमुखी पडू लागले, ज्यात वृद्धांचा भरणा सर्वात जास्त होता. लवकरच इटलीतल्या महत्त्वाच्या शहरांमधली एक पूर्ण पिढीच कोरोनाला बळी पडली. आपल्या आजी-आजोबांसोबत आपण वेळ काढायला हवा होता असे अनेकांना वाटले, मरणाऱ्यांतल्या कित्येकांनी आपल्या शेवटच्या काळात घरातल्या माणसांना व्हिडीओ कॉलवर सियाओ केले, आपल्या नातवांना देशाची काळजी घ्यायला सांगितले. अनेकांच्या अंत्यसंस्काराला फारसे लोक जाऊ शकले नाही, काही मृतदेहांवरती अद्यापही अंत्यसंस्कार होणो बाकी आहे. आपली एक आख्खी पिढी मरून गेली आहे, या विचाराने इटलीयन तरु ण प्रचंड दु:खी झाला आहे; पण आपल्या आजी-आजोबांनी शेवटच्या दिवसांत केलेली विनवणी ते विसरले नाहीत. जे झाले ते प्रचंड वाईट झालेय; पण परिस्थिती नियंत्नणात येते आहे. आता यापेक्षा जास्त काही वाईट होणार नाहीये ही दुर्दम्य आशा घेऊन इटलीचे तरु ण कामाला लागले आहेत. देश घडवायचा तर फक्त शिक्षण नाही तर प्रॅक्टिकल नॉलेजही गरजेचे आहे हे तिथल्या तरु णांना आता उमगले आहे. इटली या संकटातून नव्याने भरारी घेईल; पण त्याच्या मनावर झालेल्या जखमा कदाचित कधीही पुसल्या जाणार नाहीत.

फ्रान्स
फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांमध्ये युवकांचा आकडा बराच जास्त होता. सुरु वातीला हे प्रमाण व्यवस्थित समजले नाही; पण जसजशी आकडेवारी बाहेर येऊ लागली तसतसे युवकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याचे दिसू लागले. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अनेक 
तरु ण रु ग्ण हादरून गेले. एरव्ही तत्त्वज्ञानाच्या विचारांबाबत फ्रान्स राष्ट्र तसे बरेच हुशार आहे; पण मृत्यूच्या अंतिम तत्त्वाभोवती आल्यानंतर हे तत्त्वज्ञान बरेचसे गळून पडले, कारण कोरोनामुळे मरणा:या तरु णांच्या शेवटच्या दिवसातील यातना या वृद्धांच्या यातनांपेक्षा कैक पटीने जास्त होत्या. शारीरिक आणि मानसिकही. अजून थोडे दिवस गेले तसे युवकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे मुख्य कारण हे लठ्ठपणा असल्याचे समोर येत आहे. फ्रान्सच्या शहरी भागात तरु णांचे लठ्ठ होण्याचे प्रमाण गेले काही वर्षात प्रचंड वाढले आहे. आपल्या लठ्ठपणाबद्दल वाईट वाटून घेण्याचे कारण नाही असा बॉडीपॉझिटिव्ह संदेश तिथे लोकप्रिय होता; पण लठ्ठ असणे हे आरोग्यास घातक आहे असे सोशल मीडियात सांगण्याची कधी कुणी हिंमत केली नाही. फ्रान्समध्ये जाड्या  माणसाला जाड्या  न म्हणणो हा फक्त शिष्टाचारच नाही, तर कुणी काही म्हणत नाही किंवा म्हटले तरी त्याचे काही वाटू न देण्याचा प्रकार तिथे जास्त बोकाळला आहे. फ्रान्समधले लठ्ठ तरु ण आता आपले वजन कमी करण्याच्या मागे लागले आहेत. कित्येकांना त्यात यशही येऊ लागले आहे; पण कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर वजनाबाबतची जागरु कता अशीच टिकून राहील की मग फ्रेंच तरु ण पुन्हा खा खा करत सुटतील, याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही.

स्पेन
इटली आणि फ्रान्सच्या तरु णाईने कोरोनाच्या संकटाला दिलेल्या प्रतिसादाच्या खूप विपरीत प्रतिसाद स्पेनच्या तरु णांनी दिला. स्पेनची अर्थव्यवस्था तशी स्थिर असून, तिथल्या  रु ग्णालयांची संख्या आणि उपचारतंत्र  बरेचसे विकसित आहे. स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली तसे या रु ग्णालयांत तपासणीसाठी येणा:या तरु णांमध्ये मोठी वाढ होऊ लागली. अगदी एखादी शिंक आली तरी तरु ण-तरु णी हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्टची मागणी करू लागले. यातल्या कित्येकांना कोरोनाविषयी माहिती मिळाली होती ती व्हॉट्सअँपच्या उलटसुलट मेसेजेसमधून किंवा मग फेसबुकच्या पोस्ट्समधून. अनेकांना कोरोनाची टेस्ट फक्त सोशल मीडियामध्ये मिरवून घेण्यासाठी करायची होती. बाजारात नवे काही उत्पादन आले आहे आणि ते आपल्याकडे असलेच पाहिजे असा काहीसा भ्रम टेस्ट करण्यास इच्छुक तरुणांमध्ये होता. अनेकांनी रु ग्णालयाच्या बाहेर उभे राहून त्याच्या सेल्फीही इन्स्टाग्रामवर चिकटवल्या होत्या. आपल्या देशातल्या तरु णांचा हा उथळपणा पाहून तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे डोके फिरले आणि थेट युवकांना समजेल अशा शिव्या देत, स्पष्ट भाषेत त्यांना कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगण्यात आले. कोरोनामुळे जग ज्या परिस्थितीतून जाते आहे त्या परिस्थितीत मूर्खासारखे वागण्यात स्पेनचे तरु ण सध्यातरी अग्रेसर आहेत. 

जर्मनी
 जर्मनीत कोरोना तसा बराचसा आटोक्यात आहे. जर्मनीची आरोग्यव्यवस्थाही या संकटाशी दोन हात करायला तशी सज्ज आहे; पण नेमका हाच आत्मविश्वास तिथल्या तरु णांना कोरोना पार्ट्या  आयोजित करण्यास प्रेरित करतो आहे. घरात बसून बसून कंटाळा आलाय आणि आम्हाला काहीतरी एन्जॉयमेंट हवी म्हणून शेकडो तरु ण शहरांच्या विविध भागात गुपचुप एकत्र येऊन दारू पार्ट्या  करत आहेत. त्यांना जर्मनीच्या अर्थव्यवस्थेची विशेष काळजी नाही की भवितव्याचे काही प्रश्न नाहीत. 

इंग्लंड
जर्मनीच्या उलट यूके अर्थात इंग्लंडमधले तरु ण. ब्रेक्ङिाटनंतर इथले तारुण्य अतिशय सजग झाले आहे. या संकटातून ब्रिटनला आता आपल्यालाच वाचवावे लागेल हे त्यांना कळून चुकलेय. यूकेमधला कोरोनाचा कहर अजून थांबलेला नाही. तिथे आजही लॉकडाउन आहे. मात्र देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर हा लॉकडाउन लवकरात लवकर उघडणे  आवश्यक आहे; पण त्यातून उद्भवणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्वप्रथम तिथल्या युवकांना स्वातंत्र्य देण्याचा विचार तिथले सरकार करते आहे. त्याला युथ फस्ट पॉलिसी असे म्हटले जाते आहे. 18 ते 24 वर्षाच्या या मुलांवरती लवकरच त्यांच्या देशाचे भवितव्य अवलंबून असेल. यात ते कितपत यशस्वी होतील हे येणारा काळच सांगेल. 

अमेरिका
युरोपनंतर कोरोना व्हायरस अमेरीकेत दाखल झाला. तिथे त्याने आपली विध्वंसक शक्ती दाखवायला सुरु वात केली तसे अमेरीकेन तरु णाईचे सरळसरळ दोन तुकडे पडले. एक राष्ट्राध्यक्ष  ट्रम्प यांना मानणारे  आणि एक त्यांना नाकारणारे. डोनाल्ड ट्र्म्प हे संकुचित राजकारणाचे प्रतिनिधी असून सध्या त्यांची अमेरीकेवर अनियंत्रित सत्ता आहे. अजूनही त्यांचाच  शब्द प्रमाण मानणाऱ्या तरु णांचे प्रमाण आता तसे कमी आहे, पण तरी जे तरुण समर्थक आहेत त्याच समर्थकांना हाताशी धरु न सुरु वातील करोनाची भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही असा प्रचार राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प यांनी केला. ट्र्म्प यांचा लॉकडाउनलाही विरोध होता आणि इस्टरपर्यंत सगळे आलबेल होईल असे ते विश्वासाने सांगत होते. कोरोनाला घाबरण्याचे काही कारण नाही हा संदेश त्यांच्या तरु ण समर्थकांनी अतिशय गर्विष्ठपणे आणि दुनियेला हुशारी शिकवण्याच्या अहंकारातून इतरांनाही केला.  
मात्र लवकरच अमेरीकेतल्या कोरोनाबाधित मृतांचा आकडा हा जगातला सर्वात मोठा आकडा होऊ  लागला. तसे आता ट्र्म्प यांचे वागणे बदलले. कुठलेही विशेष संशोधन वा सिद्धता उपलब्ध नसुनही  हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन  हे औषध करोनावर अतिशय प्रभावी उपचार आहे असा प्रचार ट्र्म्प यांनी सुरु  केला. या औषधाचा पुरवठा करण्यसाठी भारताला धमकीही दिली. अमेरीकेत कोरोनाचा प्रवेश होण्यापूर्वी तिथल्या बेरोजगारीचे प्रमाण खुपच कमी होते आणि शेअरबाजार तेजीत होता. ही तेजी अशीच ठेवण्याच्या नादात ट्र्म्प यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले आणि त्यातून तिथली आरोग्यव्यवस्था पूर्णत: कोसळली. उरलेल्या आयुष्यात काय करायचे, हा मोठा प्रश्न तिथल्या तरु णांसमोर आहे. 

....आणि भारत
इतकी प्रचंड मोठी लोकसंख्या आणि साधनांचा अभाव असूनही भारताने ज्या पद्धतीने कोरोनाचे संकट आटोक्यात ठेवले आहे त्याचा विचार करता तो सर्वशक्तिमान ठरण्याच्या वाटेवर आहे खरा. लॉकडाउनमध्ये गेल्यानंतर भारताची तरु णाई कशी वागेल याचे जगभरातल्या समाजशास्त्नज्ञांना कुतूहल होते. अगदी कर्फ्यू  लागूनही तरु णांनी जोरात गाड्या  हाकणे बंद केले नाही, नंतर त्यांच्या गाड्याच काही ठिकाणी सरकारजमा झाल्या. गर्दी टाळण्याच्या सूचना असूनही भारतीय तरुणांनी गल्लीतल्या गल्लीत कट्टे भरवले. श्रीमंत वस्त्यांमधले तरु ण प्लेस्टेशनच्या नादी लागले, मध्यमवर्गीयांची मुले पबजीच्या जागी दुसरे गेम खेळायला लागले. असंख्य नवीन व्हिडीओ गेम्स पॉप्युलर झाले. कॉम्प्युटर गेम खेळणारे ज्या पद्धतीने कॉम्प्युटरला चिकटले आहेत ते पाहता ‘दुनियाकी अब कोई ताकद इन्हे एक दुसरेसे जुदा नही कर सकती’ अशी अवस्था आहे. लॉकडाउनमध्ये माणसे घरात बसून काय काय करीत आहेत, यासंबंधी माध्यमांमध्ये बरेच कुतूहल आहे. लोक घरात बसून जे काही करत आहेत त्याचे असंख्य व्हिडीओज व्हायरल होत आहेत आणि त्याला प्रतिक्रिया वा प्रतिसाद म्हणून लोकही त्याच कृती पुन्हा पुन्हा करून त्याचे नव्याने व्हिडीओ बनवत आहेत. वास्तविक डिजिटल डेटा व्हायरल होण्याची प्रक्रिया ही बरीचशी बायलॉजिकल विषाणू व्हायरल होण्याशी मिळतीजुळती . लॉकडाउनमुळे एका मोठ्या  लोकसंख्येच्या शरीराला इन्फेक्शन झाले नसले तरी त्यांच्या मनाला झालेले इन्फेक्शन वाढते आहे आणि त्यामुळे त्याचे गंभीर परिणाम तरु णाईला भोगावे लागत आहेत.

 


भारत नावाच्या या देशाचं भवितव्य तरुण ठरवतील, की त्यांच्या डोळ्यांदेखत सुटून जाईल  त्यांच्या हातातून सगळं?
- विचारा, स्वत:ला!

1.  कोरोनाची साथ आणि सोशल मीडीयाचे व्हायरल ट्रेण्ड आहेतच पण अशावेळी व्हायरल न झालेल्या ट्रेंड्सकडे पहायला हवे. भारतातल्या अनेक युवकांमध्ये वाचनाचे प्रमाण वाढले आहे. कित्येकांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाची पुस्तके सोडून दुसरे कधी काही वाचलेच नव्हते. या युवकांनी वाचलेली काही पुस्तके मात्र  इतकी भयंकर स्वरु पाची आहेत की त्यापेक्षा त्यांनी काही वाचले नसते तर बरे झाले असते असे म्हणावे इतपत ही पुस्तके वाईट आहेत. लोक जसे एकमेकांना मिसळ रेकमंड करतात आणि जी तिखट ती भारी असा न्याय लावतात त्याच पद्धतीने एकमेकांना पुस्तकं  सुचवणंही सुरु झालं आहे.
यात वाचन करु न स्वत:ची अनुभूती वाढवणे किंवा ज्ञान मिळवणो या उद्देशापेक्षा इतरांना सांगुन स्टाईल मारण्याचा प्रयत्न जास्त होतो आहे. जे वाचनाचे तेच चित्रांचेही . एरव्ही चित्रे  सगळी चांगलीच आहे पण चित्रांना  विषय असु शकतो, त्याला काळ असु शकतो, त्यातुन वेदना, राग, आनंद व्यक्त करता येऊ शकतो याबद्दल बरेच आर्टीस्ट म्हणवून घेणारे लोक अनभिज्ञ आहे. तसे पहायला गेले तर चित्रकलेसाठी इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा काळ पण जे इन्स्टाग्रामवर लाईक मिळवणार नाही ते चित्र चांगलेच नाही असा काहींचा समज आहे. जे लोक स्वयंपाक करणो शिकत आहेत तेही कमीत कमी साधनांत पौष्टिक पदार्थ बनवण्याऐवजी फेसबुकवर टाकल्यावर जास्त लाईक्स येतील अशा भासमारू रेसीपीजच्या मागे लागले आहेत. एकुण बरेचसे छंद वा कलाकृती या दुसऱ्या लोकांच्या दृष्टीकोनातुन कशा चांगल्या ठरतील यासाठी चढाओढ चालु आहे.


2. लॉकडाउनमध्ये चित्रे काढणाऱ्या आणि पुस्तके वाचणाऱ्यांचे इवलेसे ग्रुप आहेत; पण त्याखेरीज मोबाइल आणि टीव्हीमध्ये गढून गेलेल्यांची संख्या कोट्यवधींची  आहे. हा लेख लिहिला जात असताना महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी लॉकडाउनची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. अर्ध्या  कामगारांसह का होईना पण फॅक्टऱ्या लवकरच सुरू होतील, बँकांचे व्यवहार सुरळीत होतील, कार्यालयांत वर्दळ वाढेल. अनेक उद्योगधंद्याच्या ठिकाणी, रेस्टॉरंट्समध्ये, दुकानांत, पेट्रोलपंपांवर आणि देशाची अर्थव्यवस्था टिकवून ठेवणाऱ्या बऱ्याच ठिकाणी अनुभवी अंकल लोकांशिवाय तरु णही काम करतात; पण त्यांची संख्या आणि या व्यवस्थांवर असलेले त्यांचे नियंत्रण फारच कमी आहे. भारताच्या तरु णाईचा एक मोठा वर्ग बेरोजगार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था परत सुरू करताना या देशाला तरु णांची विशेष गरज असणार नाही. गेली कितीतरी वर्षे या देशातला तरु ण असाही वास्तवापासून दूर जात होता, आता कदाचित तो पूर्णपणो निरुपयोगी होईल. जे तरु ण अद्यापही विद्यार्थिदशेतच आहे त्यांचे शिक्षण पूर्ण होईल की विशेष काही शिकण्याआगोदरच त्यांना नुस्तेच मार्क देऊन पास केले जाईल, याबद्दलही साशंकता आहे.

3. हे सगळे असेच होईल असेही नाही. इंडस्ट्री उघडल्यानंतर काही दिवसात कोरोना नव्याने आपले डोके वर काढू शकतो. असे झाल्यास त्याच फैलाव वेगाने होईल आणि त्या परिस्थितीत बुजूर्गाच्या हातात असलेले देशाचे व्यवहार आणि बौद्धिक  जबाबदाऱ्या  आपल्याला तरु णांच्या हाती द्याव्या लागतील. या संभाव्य जबाबदारीसाठी भारतातल्या तरु णांनी काही पूर्वतयारी केली आहे की ऐनवेळी गुगलमध्ये सर्च करून आपण सगळे शोधू असा नेहमीचा आत्मविश्वास त्यांच्या मनात असेल? लॉकडाउनचा पिरिएड जसाजसा संपत चाललाय तसतसे तरु णांचे टेन्शन कमी होत जाईल. शेवटच्या आठवड्यात तर लॉकडाउनची काही गरज तरी होती का? असेही काहींना वाटेल. हे असे वाटण्याचे कारण म्हणजे लॉकडाउनच्या काळात घरोघरी उपलब्ध असलेली वीज आणि इंटरनेट. पंख्याखाली हवा घेत दुपारचे घरात बसून बोअर होणे आणि मोबाइलवर ल्युडो खेळत किंवा यू-टय़ूब पाहत दिवस जाणे इतकेही काही वाईट नव्हते असे अनेकांचे म्हणणे पडेल. लॉकडाउनच्या काळात काही ठिकाणी लाइट जाण्याचे प्रकार घडले, काही ठिकाणी दिवसभर वीज नव्हती, इंटरनेटवर ट्रॅफिक वाढल्याने यू-टय़ूब स्लो चालत होते, व्हिडीओ बफर व्हायला वेळ लागत होता, अशा तक्रारीही अनेकजण करतील. समजा, पूर्ण जगाचे इंटरनेटच आठवड्याभरासाठी बंद पडले तर? किंवा वीज गेली आणि चार दिवस आलीच नाही तर? वीज आणि इंटरनेटशिवाय हा देश कसा असेल? कसा वागेल? मुख्य म्हणजे त्या देशातले तरु ण नेमके काय करतील? या अतिशय कठीण प्रसंगात ते आपला देश पुन्हा घडविण्यासाठी काय करतील? 

4. एक समाज म्हणून या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळणेअवघड आहे; पण व्यक्तिगत पातळीवर विचार करता वीज आणि मोबाइल नसले तर मी कोण आहे? मला काय करता येते? काय करता येत नाही? मी स्वत:ला, माझ्या  कुटुंबीयांना आणि समाजाला कसा उपयुक्त ठरू शकतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अगदी सहज मिळणे शक्य आहे. एरव्ही हे प्रश्न कदाचित कधी तुम्ही स्वत:ला विचारलेही नसते; पण लॉकडाउनचा काळ सरताना एखादा दिवस वीज गेली किंवा चार-पाच तास इंटरनेट बंद पडले तर या प्रश्नांवर विचार नक्की करा. या देशाचे भवितव्य तरु णाईच्या हातात तेव्हाच येईल जेव्हा त्यांच्या हातातला मोबाइल जाऊन तिथे स्क्रू-ड्रायव्हर्स, मायक्रो प्रोसेसर्स, सोल्डरिंग गन्स, विळा,कात्री, टेस्ट-टय़ूब्ज, शाईपेन आणि ड्रील मशीन्स येतील. हे असे व्हायला हवे खरे; पण हे असे होईल की नाही ते या देशाचे तरु ण ठरवतील.


( राहुल मानव्यवंशशास्त्रचा अभ्यासक आहे.)
 

Web Title: coronavirus: youth all over the world - how life affected by lockdown? what will change permanently fot them..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.