लॉकडाउनमध्ये बोअर झालात? डल वाटतंय? मग हे रंग नाचवा तुमच्या नखांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 02:03 PM2020-04-30T14:03:01+5:302020-04-30T14:10:40+5:30

या लॉकडाउनमध्ये जरा नखांचा अभ्यास करा. त्यांचं आरोग्य पहा, नेलआर्टचे व्हिडीओ तर काय कधीही पाहता येतील.

coronavirus : boerd in lockdwon? feeling dull? try this butterfly nail art on your fingers. | लॉकडाउनमध्ये बोअर झालात? डल वाटतंय? मग हे रंग नाचवा तुमच्या नखांवर !

लॉकडाउनमध्ये बोअर झालात? डल वाटतंय? मग हे रंग नाचवा तुमच्या नखांवर !

Next
ठळक मुद्देफॅशनच्या आधी आरोग्याचा विचार असा करता येतोच, आता वेळ आहे तर केलेला बरा.

- निकिता बॅनर्जी

नेलपॉलिश कसं निवडायचं? आणि कसं लावायचं की, आपण क्वॉरण्टिन मुडलापण रंगीन करून टाकू. आता तुम्ही म्हणाल की, घरात तर आहोत, लॉकडाउनमध्ये कोण पाहतं? तर तसं नाही !
ऍड  कलर्स टू युअर लाइफ या सूत्रतला सगळ्यात सोपा, कमी खर्चिक, कमी वेळखाऊ आणि तातडीनं मूड बदलणारा, ब्राइट कलर्स जगण्यात भरणारा हा एक ट्रेण्ड आहे. नेलकलर्स, नेलआर्टचा.
एरव्हीही तरुण मुली नेलपॉलिशच्या दिवान्या असतात.
पण या लॉकडाउनच्या काळात अनेकजणी नेलआर्टचे व्हिडीओ पाहतात.
त्याचे प्रयोगही आपल्या नखांवर करतात.
त्यातून मस्त वाटत असेल, आपला मूड चांगला राहत असेल तर ते करायला काही हरकत नाही.
मात्र हे करताना जरा आपल्या आरोग्याचाही विचार करायला हवा.
अनेक मुली तर मिळेल तिथून मिळेल ते नेलपेंट खरेदी करतात आणि हाताना चोपडतात. तेवढय़ापुरतं ते चांगलं दिसतं; पण त्यानं आपल्या नखांवर वाइट परिणाम होतो, त्यामुळे ते रसायन बोटांना चोपडण्यापूर्वी त्याच्यावरची एक्सापायरी डेट पहा. फार जुनं असेल तर वापरू नका.
पण मग अमुक नेलपॉलिश चांगलं हे तरी कसं ठरवणार?
मुळात महागडे म्हणजे चांगले असं काही मनात असेल तर ते मनातून काढून टाका.
सुंदर निमुळती बोटं, नाजूक नखं हे सौंदर्याचं परिमाण असतं हेही मनातून काढून टाका.
त्यापलीकडे जाऊन आपल्या बोटांवर फुलपाखरांचे रंग कसे आणता येतील याचा विचार करा आणि
मग पहा, आपला मूड आणि आपल्या जगण्याचा रंगही काही काळ बदलून जाईल.
त्यासाठी हे लक्षात ठेवा.

1) आपली त्वचा, केस आणि डोळे आपलं वय सांगतात. आपण आरोग्याची किती काळजी घेतो हे सांगतात.
 त्यामुळे नेलपेण्ट लावण्यापूर्वी आपली नखं,  हात डोळ्यासमोर धरा आणि पहाच एकदा की, आपलं आरोग्य कसंय. तुमच्या अंगात रक्त किती, हिमोग्लोबिन किती आहे, याविषयी ते बरंच काही सांगतील.
ते एकदा या लॉकडाउनमध्ये जरा शांतपणो ऐका.
2) तुम्ही नखं कुरतडता का? का कुरतडता? हेही जरा पहा.  आपली नखं भयानक अवस्थेत आहेत का हे पहा. तसं असेल तर जरा डॉक्टरला फोन तर करा की, हे बरंय का म्हणून?
3) नखं मुळात स्वच्छ असली पाहिजे, अनेकींच्या नेलपेण्ट चोपडलेल्या नखांमध्ये खूप घाण असते. नखात घाण असेल तर ती वाढत नाहीत. वाइट दिसतात. ते आरोग्याला घातकही आहेत. नखांचा शेप जरा पहा. त्यांची स्वच्छता आवश्यक असेल तर करा.
4) नेलपॉलिश निवडताना एक लक्षात ठेवायचं की ती अॅक्सेटोन फ्री असली पाहिजे. नेलपॉलिशमधल्या अॅक्सेटोनमुळे नखांची मूळ चमक निघून जाते. त्यामुळे नेलपॉलिशच्या बाटल्यांवर काय काय लिहिलं आहे तेही जरा फुरसत असेल तर वाचून काढा.
5) सतत नखांवर अतिमॉइश्चर असलं तरी नखं कोरडी, रखरखीत होऊ शकतात. त्यामुळे आपली नखं तशी आहेत का पहा. 
6) तुमची नखं जर कोरडीच असतील तर त्यावर क्लिअर नेलपॉलिश लावा. बाजारात अनेक ब्रॅण्डच्या क्लिअर नेलपॉलिश मिळतात. 
7) नखं खूपचं पातळ असतील तर ‘हार्डनर्स’ प्रकारची नेलपॉलिश निवडा. नेलपॉलिश लावण्यापूर्वी बेस कोट म्हणून हे हार्डनर्स वापरता येतात. त्यात ‘फायबर’ असतं.
8) नेलपॉलिश लावताना आधी क्लिअर पॉलिश बेस कोट लावून मग टॉप कोट लावायचा. आता घरात ते नसेल तर हरकत नाही. ते नंतर आणा, आता आहे त्यात भागवा.
9) रोज रात्री झोपताना कापसाने नखांना खोबरेल तेल, पेट्रोलियम जेली, मायश्चरायझर लावणं उत्तम.
10) आपले हात नाजूक दिसावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर नखांना गोल आकार द्या. ते दिसतातही चांगले आणि गोल नखांमध्ये घाणही कमी अडकते.
लॉकडाउनमध्ये नखांचा एवढा अभ्यास बास झाला. फॅशनच्या आधी आरोग्याचा विचार असा करता येतोच, आता वेळ आहे तर केलेला बरा.

 

Web Title: coronavirus : boerd in lockdwon? feeling dull? try this butterfly nail art on your fingers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.