शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

थंडींचा रंग कोणता? मॅजेण्टा यलो आणि B & W

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 16:35 IST

थंडीत वॉर्म कलरचा हॉट ट्रेण्ड

ठळक मुद्देथंडीत कलरफूल जगून घ्या!

- निकिता महाजन

थंडी आता जाणवायला लागली आहे. निदान सकाळी आणि रात्री तरी गारवा आहे. त्यातल्या त्यात आपल्या विण्टर फॅशनची हौस भागवून घ्यायला बरं निमित्त आहे. तर दरवर्षी चर्चा असते विण्टर कलरची. तिकडे विदेशी फॅशन जगतात तर विण्टर कलर म्हणून कुठल्यातरी एका खास रंगाची चर्चा होते. तो रंग लोक हौशीनं वापरतात. वॉर्म कलर म्हणून त्याचं कौतुकही होतं.आपल्याकडे मुळात थंडी जराशी बिचकत येते. आली आली म्हणेर्पयत जातेही! मात्र यंदा आपल्याकडच्या थंडीतही तीन रंग असे आहेत जे विण्टर कलर म्हणून चर्चेत आहेत. खरं तर थंडीत काळा रंग तसाही आपल्याकडे हिट असतो. म्हणून तर आपण संक्रांतीला आवजरून काळे कपडे घालतो. उबदारपणा अनुभवतो. तर तो रंग तर ऑलटाइम इन आहेच.मात्र यंदा जर विण्टर कलर म्हणून काही ट्रेण्डी ट्राय करण्याचा मानस असेल तर एक मस्त रंग आहे.मॅजेण्टाया रंगाची जादू सध्या फॅशनच्या दुनियेतही आहे. म्हटलं तर ब्राइट म्हटलं तर सॉफ्ट, फिकटसर अशा रेंजमध्ये हा रंग फिरतो. फार लाउड वाटत नाही. अगदी कॉलेज, ऑफिस, जमलंच तर थेट फॉर्मल कार्यक्रम या ठिकाणीही हा रंग सहज वापरता येऊ शकतो. थंडीच्या डल दिवसात छान प्रसन्न वाटायचं असेल तर यंदा मॅजेण्टा रंगाचे कपडे वापरा. पर्स, चप्पल, कानातले, ब्रेसलेट अगदीच काय तर साधा हेअर बो वापरला तरी चालेल. आपल्याला हा वॉर्म कलर फक्त अ‍ॅड करायचा आहे. तो केला तर एक छान ट्रेण्डी लूक येऊच शकतो.

यलोतसा पिवळा रंग आपण फार वापरत नाही. लगेच ते टॅक्सी आणि वरणभात व्हाट्सअ‍ॅप जोक आठवत राहातात. मात्र अनुष्का शर्माचा आत्मविश्वास पाहा. ती छान थंडीत मस्त विण्टर जॅकेट घालून फिरते आहे. तिचा तो लूक खर्‍या अर्थानं हॉट आहे. आपण हिंमत केली तर हा पिवळा रंग वापरू शकतो. छान झेंडू आणि हळदीच्या फुलांचा रंग. कपडे, जॅकेट, स्टोल, स्वेटर, हेअर पिन, चपला या सगळ्यात हा छान व्हायब्रण्ट कलर वापरता येईल!

ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट चेक्स

काळा रंग तर आहेच, सध्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट चेक्सची फॅशन आहे. या थंडीत तुम्ही काळ्या-पांढर्‍या चेक्सची अनेक डिझाइन, मिस मॅच, कॉण्ट्रा मॅच हे सगळं छान करू शकतो. आपण करू ती काळी-पांढरी फॅशनेबल जादू! तेव्हा बिंधास्त स्वतर्‍ला मोकळं सोडा, आणि थंडीत कलरफूल जगून घ्या!