शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

चेजिंग द मॉन्सून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 03:00 IST

मॉन्सून केरळात येतो तिथं त्याचा हात धरायचा आणि चिंब होत थेट मेघालयापर्यंत त्याच्यासोबत जायचं ही आयडिया कशी वाटते ?

- प्रज्ञा शिदोरे

आज ७ जून. पूर्वी मृगाचा पाऊस पडायचाच यादिवशी. तो येणार म्हणून विविध आडाखे बांधले जातात. ग्रामीण भागात शेतीची कामं सुरू होतात. शहरी भागात लोकं वॉटरप्रूफिंग करून घेणे, छत्र्या, रेनकोट तयार ठेवणे; गाड्यांचं एकदा सर्व्हिसिंग करून घेणे वगैरे चर्चा सुरू होतात. प्रसारमाध्यमांमधून मॉन्सूनची तारीख, यावर्षी मॉन्सून कसा राहील, याविषयीच्या चर्चा रंगतात. थोडक्यात काय, तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या मॉन्सूनची चर्चा सगळीकडे सुरू होते.पण अशा या, आर्थिक, सामाजिक, राजकीय परिणाम असणाºया मॉन्सूनचा एकत्र अभ्यास भारतात उपलब्ध नव्हता. पण २०१३ साली महाराष्ट्रातल्या काही पत्रकार आणि अभ्यासकांनी या मॉन्सूनच्या प्रवासाचे ५ टप्पे पाडले. पहिल्या वर्षी केरळमध्ये मॉन्सूनचं होणारं आगमन टिपून त्यांनी प्रत्येक वर्षी १ असा ५ वर्ष मॉन्सूनचा प्रवास केला. या प्रवासामध्ये त्यांनी या पावसाचा आणि वातावरणाचा अभ्यास तर केलाच, पण त्या बरोबर होणारे आर्थिक, सामाजिक बदल, प्रत्येक ठिकाणच्या काही सवयी याही टिपल्या. इतिहासातील नोंदी पाहिल्या. पावसाबरोबर येणारे स्थानिक सणही अनुभवले. या सर्व गटाने ‘प्रोजेक्ट मेघदूत’ या नावाखाली आपल्या अभ्यासाची मांडणी केली आहे. हा अभ्यास तुम्ही https://projectmeghdoot.wordpress.com/about/ या संकेतस्थळावर वाचू शकता.

असाच एक अभ्यास अलेक्झांडर फ्राटर नावाच्या ब्रिटिश अभ्यासकानंही केला होता. त्याचं ‘चेजिंग द मॉन्सून’ हे १९८७ साली प्रकाशित झालेलं पुस्तक म्हणजे भारतातील मॉन्सूनचं सामाजिक वर्णन करणारं सर्वोत्तम साहित्य असंच मानलं जातं. फ्रेटरनं आपल्या प्रत्येक भारत भेटीचं नियोजन हे मॉन्सूनच्या ढगांना केंद्रस्थानी ठेवून केलं. त्याने त्याचा प्रवास कोचीन, गोवा, मुंबई आणि कलकत्ता असा केला. आणि प्रवासाचा शेवट हा चेरापुंजी या जगातल्या सर्वात जास्त पाऊस असलेल्या ठिकाणी केला. (त्यावेळी जगात सर्वाधिक पाऊस चेरापुंजीत पडायचा.) त्यानं आपल्या प्रवासाचं सुरेख वर्णन आपल्या पुस्तकात केलेलं आहे. ते पुस्तक वाचणं हा एक चिंब अनुभव आहे.अशाच मॉन्सूनच्या प्रवासाविषयी बीबीसीने तयार केलेली ही डॉक्युमेंटरीही नक्की पहा.https://www.youtube.com/watch?v=yvvuarY6LbQ

pradnya.shidore@gmail.com