Casual & Formal, Checks is a new men's style statement. | कॅज्युअल तरी फॉर्मल, तरुणांच्या जगात चेक्सचे चर्चे!
कॅज्युअल तरी फॉर्मल, तरुणांच्या जगात चेक्सचे चर्चे!

ठळक मुद्देआता पुरु षांच्या फॅशन विश्वात फॉर्मल ड्रेसकोड बराच मागे पडलाय.

सारिका पूरकर-गुजराथी

फॅशन म्हटलं की तरुणींचीच, असंच डोळ्यासमोर येतं. तरुणांची फॅशन असं वेगळं म्हणावं लागतं. त्यातही तरुणांना ऑप्शन कमी, पूर्वी तर ते फारच कमी होते.
फॉर्मल शर्ट्स, कॅज्युअल शर्ट्स, टी शर्ट, जीन्स, बॅगी पॅण्ट आणि थ्री फोर्थ. याहून पुढं यादी जायची नाही..
फॉर्मल, इनफॉर्मल आणि ऑफिस एवढाच काय तो फॅशनचा मर्यादित विचार होता. पण आता पुरु षांच्या फॅशन विश्वात फॉर्मल ड्रेसकोड बराच मागे पडलाय. 
सध्या तरी कॅज्युअल वेअरची चलती असून, अगदी ऑफिसकरतादेखील कॅज्युअल वेअरमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.  कॅज्युअल चेक्स ब्लेझर हे त्याचंच एक उदाहरण.. 
होय, सध्या कॅज्युअल ब्लेझर हा खूपच कम्फर्ट प्लस इम्प्रेशन असं टू इन वन पॅकेज देणारा पर्याय म्हणून हिट होताना दिसतोय.  चौकटीचे म्हणजेच चेक्स असलेले ब्लेझर्स हा नवीन स्टाइल मंत्ना म्हणून युवकांमध्ये लोकप्रिय होतोय.  छान प्लेन, पेस्टल शेड्सचे राउण्ड नेकचे टी शर्ट आणि त्यावर गडद रंगाचे चेक्स ब्लेझर. किंवा व्हाइस व्हर्सा कॉम्बिनेशन . 
हा लूक फार भाव खाऊन आहे. 
* पूर्वी ब्लेझर म्हटले की, आत फॉर्मल शर्ट, टाय घातले जात होते. शिवाय ब्लेझर शक्यतो प्लेन, गडद रंगाचेच दिसत. पण आता कॅज्युअल पण तरीही फॉर्मल असा लूक या चेक्स ब्लेझरने मिळतोय. राखाडी, निळसर राखाडी, काळा, तिपकरी, बॉटल ग्रीन या रंगात हे ब्लेझर उठावदार दिसतात तर ऑफ व्हाइट रंगाचेही ब्लेझर फ्रेश लूक देतात.  
* मोठय़ा आकारातील, सुटसुटीत चेक्स ब्लेझर सध्या इन आहेत. बारीक, मध्यम आकाराचे चेक्स असलेले ब्लेझरही छान दिसतात मात्न मोठय़ा चौकटीची क्र ेझ जास्त आहे.
* स्लिम फिट प्रकारातदेखील या ब्लेझरचा लूक छान दिसतो. 
* चेक्सच्या ब्लेझरप्रमाणेच चेक्स ट्राउझर्स हादेखील जीन्स, पॅण्ट्स या नेहमीच्या पर्यायांना मागे सारत युवकांनी स्वीकारलेला हिट पर्याय ठरला आहे. 
* छूकर मेरे मन को, किया तुने क्या इशारा. याराना या चित्नपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी या गाण्यात चेक्सचे, पांढर्‍या  शुभ्र रंगाचे ब्लेझर घातले होते. चेक्सचे ब्लेझर आता पुन्हा लोकप्रिय होत आहेत.
* पुरु षांच्या रेट्रो फॅशनमध्ये बिग बींचे हे चेक्स ब्लेझरदेखील टॉप टेनमध्येच असेल, यात शंका नाही. केवळ याराना चित्नपटातच नाही तर नंतरही म्हणजेच चित्नपट कारकिर्दीच्या त्यांच्या सेकंड इनिंगमध्येही बिग बी कौन बनेगा करोडपती या कार्यक्र मात तसेच अन्य समारंभात चेक्स ब्लेझर, जॅकेट घालताना नेहमी दिसून आले आहेत.  तेच हे चेक्स ब्लेझर फिरु नी पुन्हा अवतरले आहेत.  


 


Web Title: Casual & Formal, Checks is a new men's style statement.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.