शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

खरंच आपण सोशल आहोत?

By admin | Updated: September 11, 2014 17:21 IST

हाय फ्रेण्डस. जरा शांत शांत वाटतंय ना, दहा दिवस चाललेला कल्लोळ संपला

हाय फ्रेण्डस. जरा शांत शांत वाटतंय ना, दहा दिवस चाललेला कल्लोळ संपला, डीजे थंडावले.
आता पंधरा दिवस कानांना विश्रांती, मग आहेच पुन्हा दांडियाचा जल्लोष!
ह्या जल्लोषाच्या धामधुमीत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच, आपण सगळ्यांनीच आपल्या घरच्या डेकोरेशनपासून ते मोदकांपर्यंत आणि  गणपतीसह स्वत:च्या फोटोपासून ते मिरवणूकीत नाचण्यापर्यंत सगळे फोटो काढकाढून आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअँपवर टाकले, फेसबूकवर पोस्ट केले.
लाईक-कमेण्टांचा नुस्ता पाऊस पडला. स्वत:चं कौतूक करुन घेण्यासाठी अनेकजणांनी सोशल मीडीयाचा पुरेपूर वापर करुन घेतला.
पण हे करताना तुमच्या एक गोष्ट कदाचित लक्षातही आली नसेल की, सोशल मीडीया ही सोशल शेअरिंगची गोष्ट आहे, पर्सनल शेअरिंगची नाही! म्हणजे काय तर, आपल्याला जाहीरपणे जे लिहावं, बोलावंसं वाटतं त्याच्यासाठी असतो हा सोशल मीडीया. मला सर्दी झालीये आणि मी पावसात भजी खातोय हे सारं सांगत बसायला नाही. कुणी म्हणेल का नाही?
आम्हाला वाटलं ते आम्ही करू, आमचा हक्कच आहे.
आता ही अशी हक्कांची भाषा असेल तर पुढे काय बोलणार?
पण ज्यांना वाटतं की, ही माध्यमं ‘सोशल’ आहेत, ‘मी-मला ’ अशी स्वत:चीच आरती गाणारी चर्चा न करता काहीतरी सामाजिक उपक्रम इथे प्लॅन करता येऊ शकतो, समविचारी माणसं एकत्र येऊ शकतात, सामाजिक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. आपल्या मतापेक्षा वेगळी मतं, वेगळ्या बाजू, वेगळ्या पद्धतीची मांडणी समजू शकते. पण हे सारं केव्हा होऊ शकतं?
जेव्हा आपण सोशल मीडीयाचा वापर योग्य पद्धतीने करायला शिकू तेव्हा.
पण तो कसा करायचा?
मुळात सोशल मीडीया वापराचाच विचार कसा करायचा. हेच  सांगणारी एक विशेष चर्चा या अंकात.
आपण जर एकाचवेळी अनेक माणसांशी शेअर करु शकतो, कनेक्ट होऊ शकतो.
तर ते जास्त अर्थपूर्ण, अधिक आनंददायी कसं होईल. ह्याच विषयावरचा संवाद आजच्या अंकात.
वाचून नक्की कळवा.
काय वाटलं तुम्हाला?
पटलं की? आहेत काही वादाचे मुद्दे.?