शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

35 हजार तरुणांची पंढरीची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:30 PM

महाराष्ट्रभरातील 35 हजार तरुण-तरुणी दिंडय़ांसह वारीत चालले. पर्यावरणाची माहिती देत त्यांनी वारकर्‍यांशी संवाद साधला. प्रसंगी पाय चेपून दिले, झाडं लावली, खरकटय़ा पत्रावळ्या उचलून त्यांचं खत बनवलं. आणि वारकर्‍यांना मदत करता करता ते वारीतून भरभरून घेऊन आले जगण्याची ऊर्जा. त्या अनुभवाची ही रसरशीत कहाणी.

ठळक मुद्देएनएसएसच्या उपक्रमात ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी’ या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

वरदा संभूस-पाठक/सायली जोशी-पटवर्धन

 

आळंदीहून विठुनामाचा जयघोष करीत निघालेली वारी आषाढी एकादशीला पंढरपुरी दाखल होते. पालख्यांसमवेत हजारो वारकरी पायी पंढरीची वाट उन्हा-पावसात चालतात. ही महाराष्ट्राची सातशे वर्षाची वारीची परंपरा. कुणी कुणाला न बोलावता, आमंत्रण न देता, दरवर्षी माणसं का जातात वारीला, असा प्रश्न पडावा इतकं वारीचं रूप मोहक आहे, ते बोलावतं, मोह पाडतं. यंदाच्या वारीत मात्र काही हजार तरुण पावलं चालत आहेत. ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी’चा संदेश देत वारकर्‍यांसह निघालेले 35 हजार तरुण मुलं-मुली. ते ‘स्वच्छतेचे दूत’ बनून निघालेत पंढरीला. महाराष्ट्रातल्या पाच विद्यापीठांतली ही तरु ण मुलं, माउली होऊनच वारी चालत आहेत. आणि त्यांनी उचललेलं हे जनजागृतीचे पाऊल सध्या कौतुकाचा विषय ठरलं आहे. राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने (एनएसएस) विविध विद्यापीठं, केंद्रीय युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांनी संयुक्तपणे या उपक्रमाचं आयोजन केलं आहे.वारीत सहभागी ही उत्साही तरु णाई केवळ स्वच्छतेचा संदेश देऊन थांबत नाही, तर वारी मार्ग हिरवागार व्हावा यासाठी वृक्षलागवड करत चालली आहे. वारीमध्ये चालून थकलेल्या वारकर्‍यांचे पाय दाबून देण्यापासून ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यार्पयत अनेक हव्या-नको गोष्टी पाहत आहेत. त्यांच्याशी गप्पा मारत आहेत. सुख-दुर्‍ख वाटून घेत नवनवे अनुभव कमावून वारीतली शिदोरी जमा करत निघाले आहेत. हे स्वयंसेवक म्हणून झटणारे तरुण हात खर्‍या अर्थानं आपल्या ओंजळीत नवं काही सामावून घेत आहेत. देता देता घेणं आणि घेता घेता देणं शिकत आहेत. प्रसंगी वारी मार्गावर ते पोलीसमित्न म्हणून थांबतात, तर कधी मानवी साखळी बनवून गर्दीचं नियंत्नण करतात. वारीत जे मिळेल ते खातात, जसं आहे तसं राहातात. आणि ते करताना पर्यावरणाविषयी जागृती करणं हा या वारीत सहभागी होण्याचा आपला हेतूही विसरत नाहीत. त्याविषयी ते आयाबायांशी, गावखेडय़ातल्या माणसांशी त्यांना समजेल असं बोलतात. समजावून सांगतात. विशेष म्हणजे या वारीत उत्साहाने सहभागी झालेल्यांत विद्यार्थिनींचे प्रमाणही भरपूर आहे. त्याही अगदी वारकर्‍यांच्या लेकी होऊन ही वारी चालत आहेत. म्हणून तर या वारीत भेटतात अशा तरुणी ज्या अगदी हलगी वाजवण्यापासून ते कुस्तीच्या आखाडय़ात सहभाग घेण्यार्पयत आणि वारकर्‍यांचे हात-पाय चेपून देण्यापासून ते स्वच्छता मोहिमेसाठी हातात झाडू घेण्यार्पयतच्या सर्व गोष्टी उत्तम करत आहेत. वारीमध्ये सहभागी झालेल्या आणि वारीवर पीएच.डी. करत असलेल्या तसेच नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असलेल्या वरदा संभूस-पाठक. सध्या तीही वारीत इतर वारकर्‍यांसह या तरुण मुलामुलींशी गप्पा मारते आहे. बोलते आहे. त्यांना या वारीतून काय मिळतं आहे हे जाणून घेण्याचाही प्रयत्न करते आहे. अनेक तरुण मुलांशी संवाद साधून त्यांना वारीनं काय दिलं हे समजून घेत त्यांचा वारीत चालण्याचा मानस समजून घेते आहे.   तिथं तिला भेटली बारामतीतील टीसी कॉलेजची विद्यार्थिनी निकिता पाटील. निकिता सांगते,  ‘देव माणसात शोधायचा असतो ही नवी शिकवण मला वारीतून मिळाली. वारीत स्वच्छता करत असताना एका आजीबाईंनी येऊन आम्हाला चक्क नमस्कार केला. ते विशेष वाटलं आणि इथंच वारकर्‍यांकडे पाहून आम्हाला कळलं की देव माणसांत असतो, तो माणसातच शोधायला हवा. मी घरात आईने कधी पाय चेपायला सांगितले तरी मी सहज नाही म्हणायचे; पण वारीमध्ये मात्न माझ्यासह सगळ्यांनीच सेवा म्हणून वारकर्‍यांचे पाय चेपले. आम्हाला शाबासकी देत वारकर्‍यांनी आशीर्वादासाठी पाठीवर ठेवलेला हात खूप काही देऊन गेला. माणसाच्या वेदनेर्पयत पोहोचायला वारी शिकवते हे माझ्या आता लक्षात येऊ लागलंय!काही किलोमीटर वारी चालताना जगण्याचं किती मोठं अंतर निकिता आणि तिचे मित्र-मैत्रिणी चालून गेलेत, हे तिच्यासह अनेकांशी बोलताना लक्षात येतं. त्यांचा उत्साह, आपल्याला काय मिळेल याचा विचार न करता मदत करणं, सोबत चालणं, ऐकून घेणं हे सारं या तरुण मुलांनाही नव्यानं या वारीत उलगडलं असावं. कारण अनेकांनी वारीविषयी ऐकलेलं असतं, वारीची दृश्य टीव्हीवर पाहिलेली असतात; मात्र प्रत्यक्ष वारी चालणं हा किती वेगळा अनुभव असू शकतो, हे इथल्या काही तरुणांच्या अनुभवावरून कळतं.वरदाला भेटलेला, अहमदनगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजच्या मारिया थोरातसाठी तर हा संपूर्ण नवीन अनुभव आहे. ती सांगते, ‘आमच्या संपूर्ण कुटुंबातून वारीला येणारी मी पहिलीच. कीर्तन झालं, ते मी पहिल्यांदाच ऐकलं. कीर्तन झाल्यावर आम्ही एकमेकांच्या पाया पडलो, आलिंगन दिलं. त्यावेळची भावना खूप वेगळी होती. ओळखपाळख नसतानाही निर्मळ भावनेने एकमेकांना नमस्कार करणं, आलिंगन देणं हे आपल्यातील माणूसपण जागं करणारं आहे. घरापासून इतक्या दूर असताना अनोळखी व्यक्तीची झालेली ही गळाभेट आणि  त्यानंतरची मोकळेपणाची भावना खूप काही देऊन जाणारी होती. तेव्हा मी पुढच्या वर्षी पुन्हा वारीला येणार आहे!’ हे सारं आनंदानं सांगणारी मारिया जणू वारीतल्या गर्दीशी एकरूप झाली होती. जो मायिाचा अनुभव तोच नगरच्या नेहा सय्यदचा. ती प्रांजळपणाने कबूल करत सांगते,  ‘मला यापूर्वी वारी म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. वारीला जायचं म्हणून मैत्रिणीने नाव दिलं म्हणून मीही दिलं आणि मी वारीत सहभागी झाले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम अनुभव होता. हे सगळे याठिकाणी ‘माउली’ असतात. त्यांची गळाभेट घेतल्यावर मला खूप भारी वाटलं. नेहा, मारिया, निकिता यांच्यासारखेच अनुभव अन्य तरुण मुलामुलींचे. ते सारे आपलं जग विसरल्यागत वारीच्या जगाचा भाग झालेत. हा एक वेगळा अनुभव गाठीशी बांधून ते परत कॉलेजात येतील तेव्हा त्यांची ‘नजर’ बदललेली असेल, अधिक सकस, विधायक दृष्टीनं ते जग पाहतील अशी आशा आहेच. ****

पत्रावळीवर जेवा,  खरकटी पत्रावळ आम्हालाच द्या!

वारकर्‍यांच्या भोजनासाठी वापरल्या जाणार्‍या पत्रावळ्या आणि वारीतील निर्माल्य यांचं नियोजन हा महत्त्वाचा उपक्र मही या तरुण मुलांनी अत्यंत कसोशीनं पूर्ण केला. एनएसएसच्या माध्यमातून वारकर्‍यांना सुमारे 5 लाख पत्नावळ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. वारीत जेवणासाठी अनेकदा अ‍ॅल्युमिनियम फॉइल असलेल्या कागदी पत्नावळ्या किंवा थर्माकोलच्या पत्नावळ्या वापरल्या जात. अनेक दिंडय़ांमध्ये वारकरी आपलं ताट-वाटी घरून घेऊन येत. मात्र या स्टीलच्या ताटल्या आणि वाटय़ा घासण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पाणी वापरावं लागत असल्यानं ते वापरू नका असं ही तरुण मुलं वारकर्‍यांना विनवत. ताटं धुण्यासाठी वापरण्यात येत असलेला डिर्टजटही प्रदूषणासाठी कारणीभूत ठरतो, पाणी दूषित होतं म्हणून ते वापरण्याचाही आग्रह करत. थर्माकोल आणि कागद पर्यावरणाला हानिकारक असल्यानं पारंपरिक पानांच्या पत्नावळ्यांचा जेवणासाठी वापर करावा, असा आग्रह एनएसएसमधील तरु ण करत. आयाबाया, बापेबापडे त्यांचं ऐकत आणि या पत्रावळ्या स्वीकारत. विशेष म्हणजे केवळ पत्रावळ्या देऊन ते थांबले नाहीत. जेवणासाठी वापरल्या जाणार्‍या या पत्नावळ्यांवर प्रक्रि या करून त्यापासून कम्पोस्ट खत तयार केलं जाणार आहे. हे खत वारकर्‍यांना त्यांच्याच शेतात टाकण्यासाठी वाटण्यात येणार आहे. यामुळे वापरलेल्या पत्नावळ्यांचाही अतिशय उत्तम पद्धतीने विनियोग होणार आहे. एकूणच पत्नावळीचा प्रसार, वाटप, त्याविषयी जनजागृती, त्याचं खत बनविण्याची प्रक्रि या आणि या खताचं वाटप अशा संपूर्ण प्रक्रि येत विद्यार्थी सहभागी झाले आहेत.**पथनाटय़ातून संवाद

सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याचं कामही पथनाटय़ांच्या माध्यमातून हे विद्यार्थी करत आहेत. यातील जागृतीचे विषय वरकरणी लहान वाटले तरी सामाजिक भान जागृत करणारे आहेत. उदाहरणादाखल सांगायचे झालं तर, किल्ल्यांवर आपली नावं लिहू नका, प्लॅस्टिकचा जास्त वापर करू नका, प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या, जास्तीत जास्त झाडं लावा, मुलींना शिकवा, व्यसनमुक्ती अशा प्रकारचे संदेश विद्यार्थी पथनाटय़ातून देत आहेत. पथनाटय़ सादरीकरणाबाबतचा एक अनुभव एक तरुण दोस्त सांगतो. तो म्हणतो, आम्ही व्यसनमुक्तीवर पथनाटय़ सादरीकरण करत असतानाच ते पाहणार्‍या तीन तरुण वारकर्‍यांनी वारीत आपल्याकडील तंबाखूची पुडी खाली टाकली आणि पुन्हा तंबाखू खाणार नाही असं सांगूनच वारीचा पुढचा टप्पा चालण्यास सुरुवात केला. आपल्या माध्यमातून एका व्यक्तीच्या आयुष्यात जरी फरक पडला तरीही आपल्या जगण्याचं, शिक्षण घेण्याचं सार्थक आहे असं आम्हाला वाटलं!’

कडुनिंबाचं वर्ल्ड रेकॉर्ड

 वारीच्या मार्गावर हे तरु ण कडुलिंबाची रोपे लावत आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात होणार्‍या कडुनिंब लागवडीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद करण्यात येणार आहे. ही नोंद झाल्यानंतर वारी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर पोहोचेल आणि या हजारो वर्षाच्या परंपरेत आणखी एका चांगल्या कामाची नोंद होईल, अशी आशा आहे. ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी’ या एका बोधवाक्यासाठी एकत्न आलेले हे तरु ण- तरुणी वारीनंतर घरी जाताना मात्न विविध अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन जातील यात शंका नाही. **ऊर्जा मिळाली!

कोल्हापूर विद्यापीठात शिकणारा सूरज. उत्साहाने तो वारीत सहभागी झाला आहे. त्याच्या वडिलांचं 4 वर्षापूर्वी निधन झालं असल्यानं त्याच्या घरची परिस्थिती अगदी बेताची आहे. त्याची आई सध्या हज यात्नेला गेली आहे आणि हा इकडे वारीला! व्यवसाय, घरच्या जबाबदार्‍या असल्याने तो द्विधा मनर्‍स्थितीत होता. अखेर वारीला यायचं ठरवले. तो म्हणतो, ‘वारीत समजलं की, माणुसकी सर्वात मोठी गोष्ट आहे. इतके दिवस मला वाटायचं माझंच दुर्‍ख खूप मोठं आहे. मात्न याठिकाणी येणार्‍या प्रत्येकाचे काहीतरी दुर्‍ख आहे, ते कदाचित आपल्या दुर्‍खापेक्षाही मोठे आहे; पण तरीही इथे येणारा प्रत्येकजण अतिशय आनंदाने या सोहळ्यात सहभागी झाला आहे. ही गोष्ट मला सर्वात जास्त भावली आहे. प्रत्येक माणसामाणसांत देव आहे, त्यामुळे धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन हा देव आपल्याला शोधता यायला हवा. वारीतून मी अतिशय सकारात्मक ऊर्जा घेऊन परतत आहे!’**.माझं दुर्‍ख तर काहीच नाही!

ती नगरची. त्यांच्या कुटुंबातील एस.वाय.र्पयत पोहोचलेली पहिलीच मुलगी. ती सांगते आपली कहाणी तेव्हा तिचा गळा दाटून येतो. ती म्हणते, ‘ माझ्या आईचं माहेर नगर. मला शिकवायचं म्हणून आईवडिलांशी भांडली नि नगरला आली. आमच्या खानदानात मुलींना शिकवत नाहीत. मात्र आपल्या मुलांनी शिकावं म्हणून आईनं वडिलांचा विरोध सहन केला. म्हणून मी शिकले. आता चौदावीर्पयत पोहोचलेली मी पहिलीच घरातली मुलगी आहे. माझ्यासाठी माझ्या आईचा सपोर्ट खूप मोठा आहे. खरं तर मला माहितीच नव्हतं की वारी काय आहे? मात्र वारीत आल्यावर खूप प्रेमळ माणसं भेटली. वारकर्‍यांशी आम्ही बोलत होतो, संवाद साधत होतो. आमचे गट पडले, नवीन मैत्रिणी भेटल्या, खूप चांगली माणसं भेटली. इथं वारीत एक आजीबाई भेटल्या. मी तिच्याशी बोलल्यावर कळलं की, नवरा गेल्यानंतर त्या माउली एकटय़ाच आहेत. मुलीचं लग्न झालंय, पण तिला सासरी जाच आहे. सून-मुलगा विचारत नाहीत. त्या आजीबाईंचं दुर्‍ख पाहून मला वाटलं की, माझं दुर्‍ख तर खूप थोडंसं आहे. मी त्यांच्या पायाला क्रीम लावून दिली, तसं त्यांनी मायेनं हात फिरवला पाठीवरून. लेकरा, मोठी हो म्हणाल्या. अजून काय पाहिजे!’