शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलच्या माध्यमातून युवी व झहीर राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यास उत्सुक

By admin | Updated: March 31, 2015 23:29 IST

प्रदीर्घ कालावधीपासून भारतीय संघातून बाहेर असलेला अष्टपैलू युवराज सिंग आणि डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खान राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यास प्रयत्नशील

नवी दिल्ली : प्रदीर्घ कालावधीपासून भारतीय संघातून बाहेर असलेला अष्टपैलू युवराज सिंग आणि डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खान राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यास प्रयत्नशील असून आयपीएलच्या आठव्या पर्वात चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहेत.युवराज व झहीर आयपीएलच्या आठव्या पर्वात दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मंगळवारी पत्रकार परिषदेत युवी व झहीर यांनी आपला निर्धार व्यक्त केला. या वेळी युवी व झहीर यांच्यासह दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू अ‍ॅल्बी मॉर्केल, दिल्ली डेअर डेव्हिल्सचे सीईओ हेमंत दुआ आदी उपस्थित होते. झहीर व युवी यांनी आयपीएलच्या आठव्या सत्रात दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाला नवे स्थान गाठून देण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. दिल्ली संघाला गेल्या सत्रात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. दिल्ली संघाने या वेळी संघात मोठा बदल करताना आयपीएलच्या लिलावामध्ये युवराजला १६ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. युवराज म्हणाला, ‘‘यंदाच्या मोसमात स्थानिक क्रिकेटमध्ये माझी कामगिरी उल्लेखनीय ठरल्यामुळे आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली. या वेळी दिल्ली संघाला अंतिम चारमध्ये स्थान मिळवून देण्यास प्रयत्नशील असून त्यासाठी सांघिक कामगिरी होणे आवश्यक आहे.’’आगामी सत्र आव्हानात्मक असल्याचे मत झहीरने व्यक्त केले. संघात अनेक नवे चेहरे असून आम्हाला चमकदार कामगिरीची आशा आहे. संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्यासोबत चांगला ताळमेळ आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, अशी आशा असल्याचे झहीर म्हणाला.दिल्ली डेअर डेव्हिल्सचा दक्षिण आफ्रिकन खेळाडू मॉर्केलने युवी व झहीरच्या सुरात सूर मिसळताना यंदाच्या मोसमात संघाला नवे शिखर गाठून देण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. युवी व झहीर यांनी दिल्लीवासीयांना संघाला समर्थन करण्याचे आवाहन केले. (वृत्तसंस्था)