शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याकडे सोयी-सुविधांची कमतरता : सानिया मिर्झा

By admin | Updated: November 21, 2014 00:31 IST

शारीरिकदृष्ट्या टेनिस खेळ आव्हानात्मक आहे.

रोहित नाईक, मुंबईशारीरिकदृष्ट्या टेनिस खेळ आव्हानात्मक आहे. भारतीय खेळाडू आणि परदेशी खेळाडूंच्या शरीरयष्टीमध्ये खूप फरक असून, आपल्याकडे सोयी-सुविधा आणि योग्य प्रशिक्षणाचीदेखील कमतरता असल्याने आपले खेळाडू दुहेरीच्या तुलनेत एकेरीत अपयशी ठरतात, अशी खंत भारताची ‘टेनिस क्वीन’ सानिया मिर्झा हिने व्यक्त केली. एका खासगी वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘पिक्स स्कूल आॅफ बाँडिंग’ या कार्यक्रमासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेली सानिया सध्या मुंबईत असून तिने यानिमित्ताने खास ‘लोकमत’ सोबत मनमोकळेपणे गप्पा मारल्या. जगभरात २०० हून अधिक देशांमध्ये टेनिस खेळला जातो. या खेळामध्ये शारीरिक व मानसिक क्षमता निर्णायक भूमिका बजावते. आपल्याकडे अजूनही उच्च दर्जाच्या सोयी-सुविधांची कमतरता असून, खेळाडूंना मिळणारे प्रशिक्षणदेखील उच्च दर्जाचे नसते. तरीही आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होतात. शिवाय बहुतेक परदेशी खेळाडू वयाच्या ८-९ व्या वर्षी खेळण्यास सुरुवात करतात, तर आपल्याकडे १४-१५व्या वर्षी खेळायला सुरुवात होते हा फरकदेखील निर्णायक ठरतो, असेही सानियाने सांगितले.आगामी २०१५ मोसमामध्ये दुहेरीत सानिया चीनच्या हसेह सू- वेईसोबत खेळणार आहे. यावर ती म्हणाली, की यंदाच्या मोसमात झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकसोबत यशस्वी कामगिरी केली. प्रत्येक दौऱ्याचा आनंद लुटला. दुर्दैवाने आम्ही आता एकत्रित खेळणार नसलो, तरी तिला भविष्यातील कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या मोसमात वेईसोबत खेळतानादेखील यशस्वी कामगिरी होईल. ती महिला दुहेरीत अव्वल क्रमांकावर राहिलेली आहे. तिच्या सोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे. सध्या भारतात लीग टेनिसची धूम सुरू आहे. कोणत्याही खेळामधली ‘लीग’ स्पर्धा खेळाडूंसाठी नवी संधीच असते. मी स्वत: आयपीटीएलमध्ये दिग्गज खेळाडू रॉजर फेडररच्या संघातून खेळणार असून, त्याच्यासोबत खेळण्यासाठी खूप आतूर आहे. या लीग स्पर्धांमुळे टेनिस खेळाचा प्रसार होण्यास खूप मदत होणार असून, नवोदित खेळाडूंनी अधिकाधिक फायदा उचलावा, असा संदेश सानियाने दिला. सध्या सानियादेखील आत्मचरित्र लिहिण्यात व्यस्त आहे. त्याबद्दल तिने सांगितले, की आतापर्यंत २६-२७ भाग लिहून पूर्ण झाले असून, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घडामोडी त्यात टाकाव्या लागतात. २०१२ सालपर्यंतच्या घटना पूर्ण झाल्या असून, केवळ २०१३-१४ च्या गोष्टी बाकी आहेत.