शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला भारताच्या विजयामुळे आनंद झाला नाही - पत्रकारावर भडकला धोनी

By admin | Updated: March 24, 2016 10:17 IST

भारताच्या विजयाबद्दलही टीका करणा-या पत्रकारावर नाराज झालेल्या कर्णधार धोनीने त्याला चांगलंच झापलं.

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २४ - बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात झुंझार वृत्तीचे प्रदर्शन करीत भारताने बांगलादेशवर एका धावेने विजय मिळवला. मात्र या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी भडकल्याचे दिसले आणि त्याला कारणीभूत ठरला एक पत्रकार. एरवी कॅप्टन कूल अशी ओळख असलेला धोनी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रागावलेला दिसला.
' या सामन्यात भारताल मोठ्या फरकाने विजय मिळवणं गरजेचं होतं, मात्र तुम्ही हा सामना हरता-हरता जिंकलात, तुम्हाला कसाबसा विजय मिळाला... याबद्दल तुम्हाला काय वाटतं?' असा सवाल एका पत्रकाराने धोनीला विचारल्यानंतर तो भडकला आणि त्याने पत्रकाराला चांगलच फटकारलं. 
' मला माहीत आहे की भारताच्या विजयामुळे तुम्हाला आनंद झालेला नाही. तुम्ही विचारलेला हा प्रश्न आणि तुमचा टोन यावरून असं लक्षात येतयं की भारताच्या विजयामुळे तुम्हाला आनंद नव्हे दु:ख झालं आहे. क्रिकेटच्या सामन्यात कोणतीही स्क्रीप्ट नसते, टॉस हरल्यानंतर ज्या पीचवर फलंदाजी केली तिथे जास्त धावा का झाल्या नाहीत, याचं आम्हाला तिथे विश्लेषण करावं लागतं' अशा शब्दांत धोनीने त्या पत्रकाराला सणसणीत उत्तर दिलं.  एवढंच नव्हे तर ' बाहेर बसून जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचे विश्लेषण करता येत नसेल तर तुम्ही असे प्रश्नही विचारत जाऊ नका' असंही धोनीने त्याला सुनावलं.