युवा भारतीयांचे एकहाती वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:25 AM2017-07-31T02:25:05+5:302017-07-31T02:25:08+5:30

येथे झालेल्या ज्युनिअर आणि कॅडेट टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली छाप पाडताना ७ सुवर्णपदकांसह एकूण २४ पदकांची लयलूट केली.

yauvaa-bhaarataiyaancae-ekahaatai-varacasava | युवा भारतीयांचे एकहाती वर्चस्व

युवा भारतीयांचे एकहाती वर्चस्व

Next

अम्मान (जॉर्डन) : येथे झालेल्या ज्युनिअर आणि कॅडेट टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली छाप पाडताना ७ सुवर्णपदकांसह एकूण २४ पदकांची लयलूट केली. संपूर्ण स्पर्धेवर एकहाती वर्चस्व राखताना भारताने ७ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्य अशी कमाई करीत क्लीन स्वीप नोंदवला.
दरम्यान, भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची नोंद झाली असती, मात्र कॅडेट एकेरी
अंतिम सामन्यात पायल जैनला तैपईच्या सु पी-सुआन विरुद्ध ४-११, ६-११, ६-११ असा पराभव
पत्करावा लागल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर कॅडेट गटात सांघिक विजेतेपदानेही भारताला हुलकावणी दिली. पायस, याशांश मलिक आणि चिन्मया सोमैया यांना पराभवास सामोरे जावे लागल्याने भारताचे जेतेपद निसटले.
पायसने मोहम्मद अमीन समादीला ११-५, ११-९, १२-१० असे नमवून भारताला मुलांचे एकेरी जेतेपद मिळवून दिले. त्याचवेळी, मुलींच्या एकेरी अंतिम सामन्यात अनारग्य मंजूनाथ हिने तैपईच्या चेंग पु
सुयान हिला ११-७, ६-११, ११-५,
१२-१० असा धक्का देत बाजी
मारली. (वृत्तसंस्था)

Web Title: yauvaa-bhaarataiyaancae-ekahaatai-varacasava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.