Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 22:07 IST2025-07-24T22:06:20+5:302025-07-24T22:07:15+5:30

Hulk Hogan Passes Away: गेल्याच महिन्यात त्याने खूप गंभीर स्वरूपाची हृदय शस्त्रक्रिया केल्याचे वृत्त होते

WWE legend Hulk Hogan dies at 71 due to cardiac arrest | Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

WWE legend Hulk Hogan dies: ८०च्या दशकातील चाहत्यांचा 'बालपणीचा हिरो' सुप्रसिद्ध WWE सुपरस्टार हल्क होगन याचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. हल्क हॉगन याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचे निधन झाले. TMZ नुसार, गुरुवारी (२४ जुलै) सकाळी फ्लोरिडातील क्लियरवॉटर येथील हल्क हॉगनच्या घरी डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्या असल्याचे समजले. टेरी बोलेआ असे त्याचे खरे नाव होते. कुस्तीपटू म्हणून करियर करण्यासाठी त्याने हल्क हॉगन हे नाव निवडले होते.


स्टार कुस्तीपटू हल्क हॉगनच्या घराबाहेर पोलिसांची वाहने आणि आपत्कालीन वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. त्याला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत नेण्यात आले आणि रूग्णालयात घेऊन जाण्यात आले. पण त्याला वाचवता आले नाही. काही आठवड्यांपूर्वीच हल्क हॉगनच्या पत्नीने तो बेशुद्ध असल्याच्या अफवांचे खंडन केले होते. हॉगनच्या पत्नीने सांगितले होते की त्याचे हृदय मजबूत आहे आणि तो शस्त्रक्रियेतून बरा होत आहे. परंतु आज हल्क हॉगनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मे महिन्यात हल्क हॉगनने मानेची शस्त्रक्रिया झाली होती, असे टीएमझेडने त्यावेळी वृत्त दिले होते. यूएस वीकली वृत्तानुसार गेल्या महिन्यात त्याने खूपच गंभीर हृदय शस्त्रक्रियाही केल्याचे वृत्त होते.

हल्क हॉगनचा दोनदा घटस्फोट

हल्क हॉगनला त्याची पहिली पत्नी लिंडा हिच्यापासून ब्रुक आणि निक ही दोन मुले आहेत. २००७ मध्ये लिंडाशी घटस्फोट झाल्यानंतर, हॉगनने २०१० मध्ये जेनिफर मॅकडॅनियलशी लग्न केले. २०२२ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला होता.

हल्क होगनचा दमदार प्रवास

हल्क हॉगन हा फक्त एक सुप्रसिद्ध कुस्तीगीर तर होताच, त्याचसोबत ८०च्या दशकातील चाहत्यांसाठी तो 'खऱ्या जीवनातील सुपरहिरो' बनला होता. त्याची पिळदार शरीरयष्टी आणि पिवळा-लाल पोशाख ही त्याची ओळख होती. तसेच Say your prayers, eat your vitamins हे त्याचे घोषवाक्य ही त्याची खास ओळख बनली होती. सुरुवातीच्या काळात, तो विन्स मॅकमोहनच्या WWF च्या प्लॅनचा चेहरा बनला. रेसलमेनिया ३ मध्ये आंद्रे द जायंट विरुद्धचा त्याचा सामना अजूनही ऐतिहासिक मानला जातो. तो सामना विक्रमी ९३,००० हून अधिक लोकांनी थेट पाहिला होता.

Web Title: WWE legend Hulk Hogan dies at 71 due to cardiac arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.