शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

जागतिक ज्यु. बुद्धिबळ : ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचे बरोबरीवर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 4:21 AM

अर्मेनियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर अर्टुर डवत्यान याने जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना भारताचा दुसरा मानांकीत आणि संभाव्य विजेता मानला जात असलेला ग्रँडमास्टर प्रज्ञानंदला बरोबरीत रोखले.

मुंबई : अर्मेनियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर अर्टुर डवत्यान याने जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना भारताचा दुसरा मानांकीत आणि संभाव्य विजेता मानला जात असलेला ग्रँडमास्टर प्रज्ञानंदला बरोबरीत रोखले. तब्बल ९९ चालींपर्यंत रंगलेल्या या अत्यंत अटीतटीच्या लढतीत प्रज्ञानंदने बरोबरी मान्य केली. अन्य लढतीत स्पर्धेतील अव्वल मानांकीत अर्मेनियाच्याच ग्रँडमास्टर शांत सर्गस्यान यालाही बरोबरीवर समाधान मानावे लागले.अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या यजमानपदाखाली आणि अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व ‘फिडे’ यांच्या वतीने पवई येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी डवत्यानने लक्ष वेधले. १८ वर्षांखालील गटाच्या या लढतीत त्याने गँबीट ओपनिंगसह डावाची सुरुवात करताना प्रज्ञानंदला चांगलेच दडपणाखाली आणले. तब्बल ९९ चालींपर्यंत खेळ रंगल्यानंतर प्रज्ञानंदने बरोबरी मान्य केल्याने दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी अर्धा गुण वाटून देण्यात आला. दुसरीकडे, अव्वल मानांकीत सर्गस्यान यानेही बरोबरी मान्य केल्याने दोघांना स्पर्धेच्या गुणतालिकेअ २.५ गुणांसह द्वितीय स्थानी यावे लागले.त्याचवेळी, अर्मेनियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर घोलमी आर्यन, भारताचा ग्रँडमास्टर इनियान पी., जॉर्जियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर पी. निकोलोझ यांनी प्रत्येकी ३ गुणांसह आगेकूच करताना संयुक्तपणे अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. शुक्रवारी पहिल्या बोर्डवर झालेल्या सामन्यात भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर आदित्य मित्तलने सर्वांचे लक्ष वेधताना अव्वल खेळाडू सर्गस्यान याला बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. सिसिलियन बचावाने सुरुवात झालेल्या या लढतीत एकूण ६७ चाली रचल्या गेल्या. भक्कम बचावाचे प्रदर्शन केलेल्या आदित्यपुढे निभाव लागत नसल्याचे पाहून अखेर सर्गस्यान याने बरोबरी मान्य केली.मुलींच्या १६ वर्षांखालील गटात भारताच्या सी. लक्ष्मीने धक्कादायक निकाल लावला. तिने सफेद मोहऱ्यांसह खेळताना आपल्याहून २४१ गुणांनी सरस रेटिंग असलेल्या सर्बियाच्या जोवाना सरदानोविकाला नमविले. सिसिलियन तैमानोव बचावाने सुरुवात केल्यानंतर म्आक्रमक पवित्रा घेतलेल्या लक्ष्मीने ४३ चालींमध्येच बाजी मारली. यासह तिने एकूण ३ गुणांची कमाई करत संयुक्तपणे अग्रस्थान कायम राखले.१४ वर्षांखालील खुल्या वयोगटामध्ये अग्रमानांकीत भारताच्या श्रीश्वान एम. याने अपेक्षित कामगिरी करताना भारताच्याच निखिल एम. याचा पराभव केला. यासह त्याने ३ गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. दुसºया बोर्डवर १७व्या मानांकीत अमेरिकेच्या अ‍ॅलेक्स कोलाय याने अनपेक्षित निकाल नोंदवत रशियाचा द्वितीय मानांकीत फिडे मास्टर वोलोदार मुर्झिन याचा पराभव केला. किंग्स इंडियन बचावपद्धतीने सुरुवात केल्यानंत्र मुर्झिनने डावाच्या मधल्या वेळेत काही चुका केल्या. याचा फायदा घेत कोलायने वर्चस्व मिळवले. 

टॅग्स :Chessबुद्धीबळMumbaiमुंबई