शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महिला संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By admin | Updated: May 18, 2016 06:08 IST

भारतीय महिला संघाने कामगिरीत सातत्य राखताना मंगळवारी जर्मनीचा ५-० ने धुव्वा उडवला आणि उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला

कुनशान (चीन) : सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू या स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने कामगिरीत सातत्य राखताना मंगळवारी जर्मनीचा ५-० ने धुव्वा उडवला आणि उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला, पण पुरुष संघाला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे त्यांचे थॉमस कप स्पर्धेतील आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. महिला संघाने ‘ड’ गटात सोमवारी आॅस्ट्रेलियाचा ५-० ने पराभव केला होता तर मंगळवारी जर्मनीवर ५-० ने वर्चस्व गाजवले. स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे. पुरुष संघाला हाँगकाँगविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी पुरुष संघाला थायलंडविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागला होता. जागतिक महिला बॅडमिंटन क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायनाने फॅबियन दैप्रेजचा २९ मिनिटांमध्ये २१-१५, २१-१६ ने पराभव केला. एकेरीच्या दुसऱ्या लढतीत १० व्या मानांकित सिंधूने चमकदार कामगिरी करताना लुईस हेमचे आव्हान केवळ २६ मिनिटांमध्ये २१-७, २१-१२ ने मोडून काढले. महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा जोडीने लिंडा एफलर व लारा कॅपलेन या जोडीवर ४१ मिनिटांमध्ये १४-२१, २१-९, २१-८ ने संघर्षपूर्ण विजय मिळवत भारताला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. एकेरीच्या तिसऱ्या लढतीत रित्विका शिवानी गाडेने योन लीचा २७ मिनिटांमध्ये २१-५, २१-१५ ने पराभव केला. दुहेरीच्या दुसऱ्या लढतीत एन. सिक्की रेड्डी व पी.व्ही. सिंधू या जोडीने इसाबेल हर्टरिच व फ्रान्सिस्का वोल्कमॅन यांचा ५६ मिनिटांमध्ये २१-१८, १९-२१, २२-२० ने पराभव करीत भारताला ५-० ने विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. थॉमस कप स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. भारतााला हाँगकाँगविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय खेळाडूंनी संघर्षपूर्ण खेळ केला, पण अनुकूल निकाल मिळवता आला नाही. यामुळे भारताची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची आशा जवळजवळ संपुष्टात आली. (वृत्तसंस्था)