शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

कोण जाणार अंतिम फेरीत?

By admin | Updated: May 16, 2017 01:35 IST

वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात बाजी मारत थेट अंतिम फेरी गाठण्यासाठी अव्वल स्थानी असलेला मुंबई इंडियन्स आणि दुसऱ्या क्रमांकावरील रायझिंग पुणे सुपरजायंट

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी होणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात बाजी मारत थेट अंतिम फेरी गाठण्यासाठी अव्वल स्थानी असलेला मुंबई इंडियन्स आणि दुसऱ्या क्रमांकावरील रायझिंग पुणे सुपरजायंट यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल. त्याचवेळी, यंदाच्या सत्रात सर्वच संघांवर भारी पडलेल्या मुंबईकरांना पुणेकरांनी दोन वेळा नमवले आहे. त्यामुळे या दोन्ही पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मुंबईकर उत्सुक असतील. तसेच, पुण्याकडे मुंबईला दोन वेळा नमवल्याचा आत्मविश्वास असल्याने ते याच कामगिरीची पुनरावृत्ती करून अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न करतील.मुंबईने आपल्या अखेरच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला नमवून अग्रस्थान निश्चित केले. विशेष म्हणजे, या सामन्यात मुंबईने आपल्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत, राखीव खेळाडूंना संधी देत आपली बेंच स्टे्रंथ किती मजबूत आहे, हे दाखवले होते. त्यामुळे पुणेकरांना गाफिल राहून चालणार नाही. मुंबई-पुणे यांच्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल, तर पराभूत संघ हैदराबाद - कोलकाता यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध अंतिम फेरीसाठी लढेल. यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईला केवळ पुण्याने दोन वेळा नमवले. मुंबईने एकूण चार पराभव पत्करले असून त्यापैकी दोन पराभव पुण्याविरुद्ध आहेत. मुंबईची फलंदाजी मजबूत असून त्या जोरावर त्यांनी अनेक सामने जिंकले आहेत. इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जोस बटलर मायदेशी परतल्यानंतर वेस्ट इंडिजचा लेंडल सिमन्सने आपली उपयुक्तता सिद्ध करताना मुंबईला आक्रमक सुरुवात करून देण्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. तसेच, नितीश राणा, किरॉन पोलार्ड, पार्थिव पटेल आणि रोहित शर्मा यांच्यामुळे मुंबईच्या फलंदाजीला बळकटी आली आहे. त्याचबरोबर हार्दिक - कृणाल ही पांड्याबंधूंची अष्टपैलू जोडीही निर्णायक ठरत आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक असल्याने पुन्हा एकदा येथे धावांचा पाऊस पडू शकतो. मुंबईची सुरुवात सिमन्स - पार्थिव करतील. तर, तिसऱ्या स्थानी नितीश राणाच्या जागी अंबाती रायुडूला खेळविण्यात येऊ शकते. त्याचवेळी, गोलंदाजांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. पंजाबविरुद्ध सुमार मारा केलेल्या मुंबईच्या गोलंदाजांनी २०० हून अधिक धावांची खैरात केली होती. नव्या चेंडूने लसिथ मलिंगा आणि मिशेल मॅक्लेनघन सुरुवात करतील. तसेच, डेथ ओव्हर्समध्ये जसप्रीत बुमराहच्या रुपाने मुंबईकडे मुख्य अस्त्र आहे. शिवाय हार्दिकची त्याला मदत होईल. फिरकीची भिस्त अनुभवी हरभजन सिंग, कृणाल पांड्यावर असेल. दुसरीकडे, पुणेकरांनी पंजाबचा अक्षरश: फडशा पाडून दुसरे स्थान पटकावले. पुण्याची गोलंदाजी जबरदस्त मजबूत असून मूळचा मुंबईकर असलेला शार्दुल ठाकूर त्यांच्यासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. वानखेडेची खेळपट्टी चांगल्या प्रकारे ओळखून असलेला शार्दुल मुंबई इंडियन्ससाठी धोकादायक असेल. शिवाय सलामीवीर अजिंक्य रहाणे हादेखील मुंबईकर असल्याने वानखेडेच्या खेळपट्टीतला उसळीपणा तो चांगल्या प्रकारे जाणून आहे. त्यामुळे हे दोन ‘मुंबईकर’ मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरू शकतात. यातून निवडणार संघरायझिंग पुणे सुपरजायंट : स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, अशोक दिंडा, मयांक अग्रवाल, अंकित शर्मा, बाबा अपराजित, अंकुश बैन्स, रजत भाटिया, दीपक चहर, राहुल चहर, डॅन ख्रिस्टियन, लोकी फर्ग्युसन, जसकरण सिंग, उस्मान ख्वाजा, सौरभ कुमार, वॉशिंग्टन सुंदर, मिलिंद टंडन, मनोज तिवारी, अ‍ॅडम झम्पा, जयदेव उनाडकट, इश्वर पांडे, राहुल त्रिपाठी आणि शार्दुल ठाकूर. मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाळ, कृष्णप्पा गोथाम, एसेला गुणरत्ने, हरभजन सिंग, मिशेल जॉन्सन, कुलवंत के., सिद्धेश लाड, मिशेल मॅक्लेनघन, लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, निकोलस पुरान, दीपक पुनिया, नितीश राणा, अंबाती रायुडू, जितेश शर्मा, कर्ण शर्मा, लेंडल सिमन्स, टीम साऊदी, जगदीश सुचिथ, सौरभ तिवारी आणि विनयकुमार.