शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चौथा कोण? आज ठरणार

By admin | Updated: March 9, 2015 01:04 IST

‘अ’ गटात आव्हान कायम राखण्यासाठी संघर्ष करीत असलेला इंग्लंड संघ आणि थोडेसे परिश्रम आणि थोडी नशीबाची साथ मिळाल्यामुळे ६ गुणासह

अ‍ॅडिलेड : ‘अ’ गटात आव्हान कायम राखण्यासाठी संघर्ष करीत असलेला इंग्लंड संघ आणि थोडेसे परिश्रम आणि थोडी नशीबाची साथ मिळाल्यामुळे ६ गुणासह तिसऱ्या क्रमांकावर असलेला बांगलादेश यांच्यात सोमवारी महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांना या आज विजय मिळविणे आवश्यक आहे. ‘अ’ गटातून न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलियाने बाद फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडबरोबरचा शेवटचा सामना जिंकून श्रीलंकाही ८ गुणांसह उपांत्यपूर्व फेरीत पोहचेल. त्यामुळे या गटातील बाद फेरीतील चौथा संघ कोण? याचे उत्तर आजच्या सामन्यातून मिळणार आहे. २०११ च्या विश्वकप स्पर्धेत इंग्लंडला बांगलादेशविरुद्ध दोन विकेटस्ने पराभव स्वीकारावा लागला होता, तरी इंग्लंड संघ उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. यावेळी मात्र इंग्लंडपुढे ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. बांगलादेशविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. इंग्लंडने आतापर्यंत कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्ध (आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका) तीन सामने गमावले आहेत. त्यांनी एकमेव विजय स्कॉटलंडसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध मिळविलेला आहे. श्रीलंकेविरुद्ध यापूर्वी खेळल्या गेलेल्या लढतीत इंग्लंडला ३१० धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यात अपयश आले. प्रतिस्पर्धी संघाने १६ चेंडू व ९ गडी राखून विजय साकारला. इंग्लंडला सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मिळविण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज आहे. इंग्लंडतर्फे मोईन अलीने स्कॉटलंडविरुद्ध तर जो रुटने श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी केली आहे. यांच्या व्यतिरिक्त इंग्लंड संघातील केवळ दोघांनी या स्पर्धेत अर्धशतकी खेळी केलेली आहे. कर्णधार इयोन मोर्गनने या स्पर्धेत केवळ २२.५० च्या सरासरीने केवळ ९० धावा फटकाविल्या आहेत. त्याचप्रमाणे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. अँडरसनने या स्पर्धेत ९१ च्या सरासरीने केवळ २ बळी घेतले आहे.