दुसरी कसोटी जिंकून विंडीजची बरोबरी

By Admin | Updated: June 22, 2014 00:28 IST2014-06-22T00:28:37+5:302014-06-22T00:28:37+5:30

ािस गेलच्या तुफानी 8क् धावांच्या जोरावर यजमान वेस्ट इंडीज संघाने न्यूझीलंडला 1क् विकेटस्नी हरवूून दुसरा कसोटी सामना जिंकला.

The West Indies match with the second Test match | दुसरी कसोटी जिंकून विंडीजची बरोबरी

दुसरी कसोटी जिंकून विंडीजची बरोबरी

>त्रिनिदाद : ािस गेलच्या तुफानी 8क् धावांच्या जोरावर यजमान वेस्ट इंडीज संघाने न्यूझीलंडला 1क् विकेटस्नी हरवूून दुसरा कसोटी सामना जिंकला. या विजयाने विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. गेलने 28 चेंडूंत अर्धशतक झळकावून कसोटीत जलद अर्धशतक करणा:या फलंदाजांच्या टॉप टेन यादीत आठवे स्थान पटकावले आहे. 
त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क मैदानावर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने दुस:या डावात 331 धावा करून विंडीजपुढे 93 धावांचे लक्ष्य ठेवले होते. विंडीजने 13.2 षटकांत हे आव्हान पूर्ण केले. दोन्ही संघांदरम्यान मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना ब्रिजटाउन येथे 26 तारखेपासून खेळविण्यात येणार आहे. 
सलामीवीर गेलने सात चौकार आणि सहा षटकारांच्या साहाय्याने केवळ 46 चेंडूंत नाबाद 8क् धावांची तुफानी खेळी केली. तर क्रेग ब्रेथवेटने 34 चेंडूंत एक चौकार ठोकून 14 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. ब्रेथवेटने पहिल्या फेरीत तडाखेबाज शतक ठोकल्यामुळे त्याला ‘मॅन ऑफ मॅच’ने सन्मानित केले गेले. (वृत्तसंस्था)
 

Web Title: The West Indies match with the second Test match