शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वावरिंकाची जेतेपदाची हॅट्ट्रिक

By admin | Updated: January 11, 2016 03:20 IST

गत दोन वेळेसचा चॅम्पियन आणि अव्वल मानांकित स्वीत्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंका याने ४,२५,५३५ डॉलरच्या चेन्नई ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या अंतिम

चेन्नई : गत दोन वेळेसचा चॅम्पियन आणि अव्वल मानांकित स्वीत्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंका याने ४,२५,५३५ डॉलरच्या चेन्नई ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत रविवारी क्रोएशियाच्या बोर्ना कोरीच याचा पराभव करीत सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.अव्वल मानांकित वावरिंकाने आठव्या मानांकित कोरीच याचा ६-३, ७-५ असा सलक सेटस्मध्ये पराभव करीत विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवली. वावरिंकाने फ्रान्सच्या बेनोएट पेयरे याला पराभूत करीत अंतिम फेरीत धडक मारली होती, तर कोरीचने ब्रिटनच्या एल्जाज बेदेने याला धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. ३0 वर्षीय वावरिंकाने एक तास २६ मिनिटे चाललेल्या या लढतीत जबरदस्त कामगिरी केली. जागतिक क्रमवारीतील चौथ्या मानांकित खेळाडू वावरिंकाने पहिल्या सेटमध्ये ६-३ असा सहज विजय मिळवला; परंतु दुसरा सेट चुरशीचा ठरला. स्वीस स्टारने दुसरा सेट ७-५ असा जिंकताना ही लढत आणि सामना आपल्या नावावर केली आणि सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा गौरव प्राप्त केला.(वृत्तसंस्था)