शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा ‘फ्लार्इंग सिख’ पाहण्याची इच्छा : मिल्खा सिंग

By admin | Updated: May 10, 2016 02:46 IST

रोम आॅलिम्पिकमधील माझ्या कामगिरीला आता सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आपल्या भारत देशाची लोकसंख्या सुमारे १२० कोटींपर्यंत गेली, पण अजूनही दुसरा मिल्खा सिंग निर्माण होऊ शकला नाही

पुणे : रोम आॅलिम्पिकमधील माझ्या कामगिरीला आता सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आपल्या भारत देशाची लोकसंख्या सुमारे १२० कोटींपर्यंत गेली, पण अजूनही दुसरा मिल्खा सिंग निर्माण होऊ शकला नाही, याची मला सारखी खंत वाटते आणि दु:ख होते. मी आता नव्वदीच्या घरात आहे. हे जग सोडण्यापूर्वी एखादा तरुण किंवा तरुणी मिल्खा सिंग बनेल आणि ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड क्रीडाप्रकारात आपल्या देशाचा तिरंगा फडकावेल, अशी इच्छा आहे. हा सुदिन उजाडण्याचीच मी वाट पाहत आहे, असे भावपूर्ण उद्गार ‘फ्लार्इंग सिख’ मिल्खा सिंग यांनी काढले.कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पोचा (पीआयएसई) रविवारी समारोप झाला. यानिमित्त रिओ आॅलिंपिकसाठी स्पर्धकांना शुभेच्छा देण्याचा, तसेच यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला. या वेळी मिल्खा यांनी आपल्या आयुष्यातील हृदयद्रावक आणि हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा देताना उपस्थितांना हेलावून सोडले. व्यासपीठावर विशाल चोरडिया, मंदार ताम्हाणे उपस्थित होते.खेळाडूंना सल्ला देताना ते म्हणाले, की आमच्या पिढीने, तसेच पी. टी. उषा, अंजू जॉर्ज अशा खेळाडूंनी खूप मेहनत केली. आजच्या पिढीला मात्र झटपट यश हवे आहे आणि म्हणून अनेक जण ड्रग्ज घेतात, हे योग्य नाही. यामुळे अनेक स्पर्धांत आपली पदके काढून घेतली गेली. देशाची नाचक्की झाली. तरुण खेळाडूंनी ड्रग्जचा नव्हे, मेहनतीचा पर्याय निवडावा. पैशासाठी मॅच-फिक्सिंगही करू नये. फाळणीच्या रक्तरंजित इतिहासाचे साक्षीदार असलेल्या मिल्खा सिंग यांनी देशप्रेमाचा सल्ला दिला. जेथे जाल तेथे देशाचा लौकिक उंचावणारी कामगिरी करा. आपण फार मोठ्या संघर्षानंतर देश स्वतंत्र केला आहे. देशाच्या प्रतिमेला तडा जाऊ देऊ नका, असे ते म्हणाले.मिल्खा यांच्या हस्ते रिओ आॅलिंपिकला पात्र ठरलेला मल्ल नरसिंग यादव, रोर्इंगपटू दत्तू भोकनाळ यांच्यासह ईशा करवडे, तेजस्विनी मुळे, बालकल्याण संस्थेची गौरी गाडगीळ, वैष्णवी जगताप, पॅरा खेळाडू माधवी लता, भरत चव्हाण, बालकल्याणचे प्रशिक्षक अभिजित तांबे, अशोक नांगरे, गजानन पाटील, प्रवीण ढगे, राजेंद्र सापटे, धीरज मिश्रा, दीपाली निकम, बीईजीचे जगन्नाथ लकडे, सी. प्रकाश, सागर ठाकूर, अँथनी दास परेरा, तसेच राजू दाभाडे, राहुल राणे यांचा सत्कार करण्यात आला.नरसिंगने सांगितले, की रिओ आॅलिंपिकसाठी माझी चांगली तयारी सुरू आहे. देशासाठी सुवर्णपदक जिंकणे हेच एकमेव ध्येय आहे. दत्तू म्हणाला, की आॅलिंपिक म्हणून वेगळी स्पर्धा असा माझा दृष्टिकोन नाही. महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावणारी कामगिरी करायची हाच निर्धार आहे. डॉ. विश्वजित कदम यांनी स्वागतपर भाषणात सांगितले, की आपल्या देशाचे अनेक खेळाडू कौटुंबिक पार्श्वभूमी खेळाची नसताना आणि उलट ती प्रतिकूल असताना यश मिळवित आहेत. अशा पराक्रमी खेळाडूंचा प्रातिनिधीक सत्कार करणे हा पीआयएसईचा बहुमान आहे. (क्रीडा प्रतिनिधी)