वीरूच्या 'त्या' ट्विटला बिग बींची दाद

By Admin | Updated: August 18, 2016 20:40 IST2016-08-18T20:40:35+5:302016-08-18T20:40:35+5:30

साक्षीच्या या यशानंतर वीरेंद्र सेहवागने शोभा डे यांचा त्याच्या खास शैलीत समाचार घेतला आहे.

Viru's 'That' tweet Big Binny Shirt | वीरूच्या 'त्या' ट्विटला बिग बींची दाद

वीरूच्या 'त्या' ट्विटला बिग बींची दाद

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.  18 - भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग सध्या क्रिकेटच्या मैदानावर नव्हे, तर टि्वटरच्या माध्यमातून चर्चेत आला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणारी साक्षी मलिक ही पहिली महिला पैलवान ठरली आहे. साक्षीच्या या यशानंतर वीरेंद्र सेहवागने शोभा डे यांचा त्याच्या खास शैलीत समाचार घेतला आहे. 
 
"साक्षी मलिक के गले में मेडल कितना ''शोभा डे'' राहा है ना", अशा प्रकारचं टि्वट करून वीरेंद्र सेहवागनं धुमाकूळ उडवून दिला. ट्विटरवर वीरेंद्र सेहवागचा मोठा फॅन क्लब असल्यामुळे त्याच्या त्या ट्विटवर अक्षरशः त्याचे फॅन तुटून पडले होते. वीरूचं हे ट्विट 6 हजार वेळा रिट्विट झालं असून, तब्बल 5200 हून जास्त लोकांनी हे ट्विट लाइक केलं आहे.  
 
विशेष म्हणजे त्यात बिग बींनीही उडी घेतली आहे. "वीरूजी आपका सेन्स ऑफ ह्युमर अच्छा है" म्हणत अमिताभ बच्चन यांनी त्यांना दिलखुलास दाद दिली आहे. 
 

Web Title: Viru's 'That' tweet Big Binny Shirt