शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार

By admin | Updated: October 22, 2014 04:53 IST

: टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील सुरुवातीच्या तीन वन-डे सामन्यांतून विश्रांती देण्यात आली आहे़

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील सुरुवातीच्या तीन वन-डे सामन्यांतून विश्रांती देण्यात आली आहे़ त्याच्या अनुपस्थितीत विराट कोहलीकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे़ सराव सामन्यासाठी भारतीय ‘अ’ संघही घोषित करण्यात आला आहे़ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी लंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे़ वेस्ट इंडीजने भारत दौऱ्यातील वन-डे मालिका मध्येच सोडून दिल्यामुळे भारताने श्रीलंकेला भारत दौऱ्यावर बोलविले आहे़ वेस्ट इंडीजविरुद्धच्या सिरीजमध्ये संघातून बाहेर ठेवण्यात आलेल्या आऱ आश्विनला टीममध्ये जागा मिळाली आहे, तर अमित मिश्रा आणि अक्षर पटेल या फिरकी गोलंदाजांचाही संघात समावेश करण्यात आला आहे़१९ वर्षीय चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला सिनिअर संघात जागा मिळू शकली नाही़ मात्र, त्याला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यासाठी भारतीय ‘अ’ संघात संधी देण्यात आली आहे़ दुखापतीतून सावरत असलेला अनुभवी फलंदाज रोहित शर्मा यालासुद्धा पहिल्या तीन वन-डेत स्थान देण्यात आले आहे़विराट कोहलीकडे तिसऱ्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे़ यापूर्वी २०१३ मध्ये धोनीला दुखापत झाल्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्ध कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली होती, तर मार्चमध्ये झिम्बाब्वे आणि आशिया चषकातही विराट टीम इंडियाचा कर्णधार होता़ (वृत्तसंस्था)०