विनेशचं स्वागत करताना उत्साहाच्या भरात बजरंग पूनियाकडून झाली मोठी चूक, झाला ट्रोल, फॅन्स म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 19:21 IST2024-08-17T18:37:43+5:302024-08-17T19:21:05+5:30
Vinesh Phogat Welcome News: आज मायदेशी परतलेल्या कुस्तिपटू विनेश फोगाटचं दिल्लीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. दरम्यान, विनेशचं स्वागत करत असताना बजरंग पुनियाकडून उत्साहाच्या भरात झालेल्या एका चुकीची आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

विनेशचं स्वागत करताना उत्साहाच्या भरात बजरंग पूनियाकडून झाली मोठी चूक, झाला ट्रोल, फॅन्स म्हणाले...
भारताचीकुस्तीपटू विनेश फोगाट हिच्यासोबत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, आज मायदेशी परतलेल्या विनेशचं दिल्लीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी विनेशचे सहकारी असलेले बजरंग पूनिया आणि साक्षी मलिक आदी ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तिपटूही उपस्थित होते. दरम्यान, विनेशचं स्वागत करत असताना बजरंग पुनियाकडून उत्साहाच्या भरात झालेल्या एका चुकीची आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तसेच त्यावरून बजरंग पूनिया याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात येत आहे.
विनेश फोगाट हिचं स्वागत करण्यासाठी काढण्यात येत असलेल्या मिरवणुकीचे अनेक व्हिडीओ सोशल माीडियावर शेअर केले जात आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये बजरंग पूनिया हा कारच्या बोनेटवर उभा राहून स्वागतासाठी झालेल्या गर्दीला बाजूला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यादरम्यान, बजरंग याचा पाय कारवर चिकटवलेल्या तिरंग्याला लागताना दिसत आहे. मात्र बजरंग याने तिथे असलेला तिरंगा पाहिला नव्हता. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फॅन्स मात्र संतप्त झाल्याचं दिसत होतं.
Hello @BajrangPunia
— Sadhvi Prachi 🇮🇳 (@Sadhvi_prachi) August 17, 2024
तिरंगे का अपमान करना बंद करो। 😡 pic.twitter.com/UnO9rwXszP
त्यापैकी सोशल मीडियावरील काही युझर्सनी बजरंग पूनिया याला ट्रोल केलं. एकाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं की, तिरंग्याचा अपमान करणं बंद करा. आणखी एका युझर्सने लिहिलं की, बजरंग पूनिया याने माफी मागितली पाहिजे. मात्र काहीजण बजरंग याचा बचाव करतानाही दिसत होते. त्यापैकी काहींनी बजरंगकडून अनावधानाने ही चूक झाल्याचं म्हटलं आहे.