शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

विनेशनं सिल्व्हर मेडलसंदर्भातील निकालाआधी सोडलं ऑलिम्पिकचं गाव!; तब्येत ठिक; पण Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 10:57 IST

तारीख पे तारीख या सीननंतर मंगळवारी विनेश फोगाटसंदर्भातील बहुप्रतिक्षित खटल्याचा निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.

भारतीय कुस्तीपटूविनेश फोगट हिने सोमवारी पॅरिस ऑलिम्पिक गेम्सच्या समारोप सोहळ्यानंतर ऑलिम्पिक गाव सोडलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जोरदार मुंसडी मारत विनेश फोगट अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती.

पण अतिरिक्त वजनामुळे गोल्ड मेडलच्या मॅचआधी तिला अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयाच्या विरोधात विनेशनं  फोगाट हिने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) धाव घेतली आहे. संयुक्तरित्या रौप्य पदक मिळावे, अशी मागणी तिने संबंधित याचिकेच्या माध्यमातून केली आहे. 

तारीख पे तारीख सीन!

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाच्या  (CAS) तारीख पे तारीख या सिलसिल्यानंतर मंगळवारी या बहुप्रतिक्षित खटल्याचा निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. या निकालाआधी कुस्तीपटू मायदेशीर परतली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करताना विनेश फोगाट हिने 50 किलो वजनी गटातील फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारातील गत ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत आघाडीवर असणारी जपानची युई सुसाकी हिला पराभूत करत आपली जादू दाखवली होती. तिचा हा विजय भारतासाठी कुस्तीच्या आखाड्यातून सुवर्ण पदकाची चाहुल घेऊन आला. ऐतिहासिक कामगिरीसह अंतिम फेरी गाठल्यावर 100 ग्रॅम वजनानं घात झाला. 

वजन कमी करण्यासाठी खूप काही केलं, शेवटी रुग्णालयात दाखल करण्याचीही आली वेळ

ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर विनेश फोगाटचे वजन जवळपास ३ किलोंनी वाढले होते. कोणत्याही परिस्थितीत सुवर्ण संधी सोडायची नाही, हे लक्षात घेऊन तिने वजन कमी करण्यासाठी कठोर प्रयत्न केले. या कसरतीमुळे डिहाड्रेशनमुळे ती बेशुद्धही पडली होती. त्यानंतर तिला ऑलिम्पिक गावातातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या नाजूक परिस्थितीतून सावरतच विनेश फोगाटनं संयुक्त रौप्य पदक मिळावे, .यासाय़ी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे धाव घेतली. आता तिची प्रकृतीही ठिक आहे. पण सध्या ती कोणासोबतही काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. निकाल कधी येणार? त्यावर तिची पहिली प्रतिक्रिया काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तिला रौप्य पदकाचा सन्मान मिळेल, हीच आस 

विनेश फोगाट हिने  क्यूबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुजमान लोपेजसह संयुक्तरित्या रौप्य पदक देण्याचा  विचार करावा, असे  आपल्या याचिकेत म्हटलं आहे. भारतीय कुस्तीपटू अपात्र ठरल्यानंतर क्यूबाच्या कुस्तीपटूला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली होती. भारतीय ऑलिम्पिक समितीसह क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी क्रीडा लवाद या प्रकरणात सकारात्मक निर्णय देईल, अशी आशा व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Wrestlingकुस्ती