शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ रणजी सुधारित

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

विजय शंकरची शतकी खेळी

विजय शंकरची शतकी खेळी
रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरी : तामिळनाडू पहिला डाव ४०३, विदर्भ बिनबाद ९

नागपूर : विजय शंकरची (१११) शतकी खेळी व इंदरजित (९७) झळकाविलेल्या अर्धशतकाच्या जोरावर तामिळनाडूने विदर्भाविरुद्ध रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ४०३ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना विदर्भाने दिवसअखेर बिनबाद ९ धावा केल्या होत्या. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या लढतीत आजचा खेळ थांबला त्यावेळी ७ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या फैज फझल याला सचिन कटारिया (१) साथ देत होता.
त्याआधी, कालच्या ४ बाद २३४ धावसंख्येवरून पुढे खेळताना तामिळनाडूने पहिल्या डावात ४०३ धावांची दमदार मजल मारली. शंकरने शतकी खेळी करीत धावसंख्येला आकार दिला. सोमवारी नाबाद असलेला फलंदाज आर. प्रसन्ना (२२) दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम बाद झाला. शतकी खेळी केल्यानंतर शंकरही माघारी परतला. शंकरने ३०५ चेंडूंना सामोरे जाताना १११ धावा फटकाविल्या. त्यात १३ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. इंदरजितने त्यानंतर रंगराजनसोबत (२७) सातव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली आणि संघाला साडेतीनशेचा पल्ला ओलांडून दिला. एका टोकाकडून फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या टोकाकडून इंदरजितने संयमी फलंदाजी केली. तामिळनाडूच्या डावात बाद होणार तो अखेरचा फलंदाज ठरला. त्याने २३६ चेंडूंना सामोरे जाताना ९७ धावा फटकाविल्या. त्यात १० चौकारांचा समावेश आहे. विदर्भातर्फे राकेश ध्रुवने १०६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले तर श्रीकांत वाघ व आर.डी. ठाकूर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. (क्रीडा प्रतिनिधी)
धावफलक
तामिळनाडू पहिला डाव : अभिनव मुकुंद त्रि. गो. वाघ ११, मुरली विजय झे. फझल गो. ठाकूर ९६, बाबा अपराजित धावबाद (जांगिड) १०, दिनेश कार्तिक झे. फझल गो. ठाकूर ०४, व्ही. शंकर पायचित गो. ध्रुव १११, आर. परमेश्वरन धावबाद (बद्रीनाथ) २२, बी. इंदरजित त्रि. गो. जांगिड ९७, एम. रंगराजन पायचित गो. वाघ २७, ए. अश्विन ख्रिस्ट झे. कटारिया गो. ध्रुव ०७, एल. बालाजी झे. कटारिया गो. ध्रुव ००, पी. परमेश्वरन नाबाद ००. अवांतर (१८). एकूण १६९.५ षटकांत सर्वबाद ४०३. बाद क्रम : १-१७, २-४१, ३-५०, ४-१९०, ५-२४८, ६-२८३, ७-३५६, ८-३८६, ९-४०१, १०-४०३. गोलंदाजी : श्रीकांत वाघ ३४-१७-५३-२, एस. बंडीवार ३८.५-८-९४-०, आर. ठाकूर ३८.३-११-७१-२, फैज फझल १५-४-४७-०, आर. ध्रुव ३५.४-४-१०६-३, आर. जांगिड ७.५-०-२३-१.
विदर्भ पहिला डाव :- फैज फझल खेळत आहे ०७, एस. कटारिया खेळत आहे ०१. अवांतर (१). एकूण ५ षटकांत बिनबाद ९. गोलंदाजी : पी. परमेश्वरन २-१-८-०, एल. बालाजी २-२-०-०, ए. अश्विन ख्रिस्ट १-०-१-०.