शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वेगाचा विश्वविक्रमी बादशाह निवृत्त होतोय

By admin | Updated: March 23, 2016 03:15 IST

पृथ्वीतलावरील सर्वांत वेगवान मनुष्य असा लौकिक मिळवलेला जमैकाचा ‘स्प्रिंट किंग’ उसेन बोल्ट याने आगामी रिओ आॅलिम्पिक आपली शेवटची आॅलिम्पिक असल्याचे सांगत

किंग्सटन : पृथ्वीतलावरील सर्वांत वेगवान मनुष्य असा लौकिक मिळवलेला जमैकाचा ‘स्प्रिंट किंग’ उसेन बोल्ट याने आगामी रिओ आॅलिम्पिक आपली शेवटची आॅलिम्पिक असल्याचे सांगत आपल्या निवृत्तीचे संकेत दिले. विशेष म्हणजे बोल्ट २०२० मध्ये जपानला (टोकियो) होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये खेळणार असल्याची चर्चा होती. मात्र, रिओ आॅलिम्पिक स्पर्धेबाबत घोषणा करून बोल्टने सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. त्याचबरोबर लंडन - २०१७ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचेही बोल्टने स्पष्ट केले.आधुनिक अ‍ॅथलेटिक्सचा चेहरा असलेल्या उसेन बोल्टने अनेक विश्वविक्रमांना गवसणी घालताना स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले. दखल घेण्याची बाब म्हणजे प्रशिक्षक ग्लेन मिल्स यांच्या सल्ल्यानुसार तंदुरुस्ती राखल्यास मी टोकियो आॅलिम्पिकपर्यंत खेळू शकतो, असे वक्तव्य करून बोल्टने आपल्या दिमाखदार कारकिर्दीबाबत उत्सुकता वाढवली होती. मात्र, बोल्टने वृत्तसंस्थेला आपल्या निवृत्तीबाबत माहिती देताना सांगितले, की यंदाची आॅलिम्पिक माझी शेवटची स्पर्धा असून, या स्पर्धेत आणखी तीन सुवर्ण जिंकण्याचा निर्धार आहे.याविषयी बोल्ट म्हणाला, ‘‘निश्चितपणे रिओ आॅलिम्पिक माझी शेवटची आॅलिम्पिक स्पर्धा असेल. माझ्यासाठी आणखी चार वर्षे खूप कठीण आहे. मला जे साध्य करायचे आहे, ते मी रिओमध्ये साध्य केल्यास ती प्रेरणा आणखी चार वर्षे टिकवून ठेवणे माझ्यासाठी कठीण आहे. त्यामुळेच आणखी चार वर्षे हेच सातत्य कायम राखणे कठीण असल्याची जाणीव असल्याने ही स्पर्धा माझ्यासाठी अखेरची आॅलिम्पिक असेल.’’ बोल्टने २००८ व २०१२ साली आॅलिम्पिकमध्ये एकूण ६ सुवर्ण पदकांची लयलूट केली. २०१७ मध्ये लंडनमध्ये होणाऱ्या विश्व अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतून आपल्या कारकिर्दीची ‘अंतिम रेषा’ पार करण्याची बोल्टची योजना आहे.