Usain Bolt begged British model for sexy pics two days before lover gave birth to their first child svg | उसेन बोल्टवर ब्रिटिश मॉडलचे गंभीर आरोप; प्रेयसी गर्भवती असताना करायचा अश्लील मॅसेज

उसेन बोल्टवर ब्रिटिश मॉडलचे गंभीर आरोप; प्रेयसी गर्भवती असताना करायचा अश्लील मॅसेज

जगातील वेगवान धावपटू असलेल्या उसेन बोल्टला काही दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्ती झाली. त्याची प्रेयसी केसी बेनेट हीनं मुलीला जन्म दिला. जमैकाचे पंतप्रधान अँण्ड्य्रू होलनेस यांनी सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी देताना बोल्ट व केसी यांचे अभिनंदन केले. पण, आता बोल्टवर ब्रिटिश मॉडलनं गंभीर आरोप केले आहेत. मुलीच जन्म होण्याच्या दोन दिवसांपूर्वी बोल्टनं या मॉडलकडून Sexy फोटो पाठवण्यास सांगितले होतं, असं त्या मॉडलचं म्हणणं आहे.

22 वर्षीय शॅरी हैलीडे असं या ब्रिटिश मॉडलचं नाव आहे. बोल्टचं प्रेमप्रकरण आहे, याची माहिती नसल्याचेही शॅरीनं सांगितलं. बोल्ट अनेक दिवसांपासून तिला संपर्क करत होता.  मुलगी होण्याआधी दोन दिवसांपूर्वी बोल्ट माझ्याकडे अश्लील फोटो दाखवण्याची मागणी करत होता, असा दावा शॅरीनं केला आहे. शॅरीनं अश्लील फोटो पाठवलेही. पण, जेव्हा शॅरीला बोल्टच्या नात्याबद्दल कळलं, तेव्हा तिला धक्का बसला.  

 बोल्ट आणि शॅरी यांची भेट गतवर्षी लंडन येथे झाली. हे दोघंही एका नाईट क्लबमध्ये भेटले. बोल्टने तेव्हा शॅरीची मैत्री करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यानं तिला हॉटेल रुममध्येही बोलावले होते. त्यानंतर दोघांमध्ये अनेक रोमँटिक गप्पाही रंगल्या. पण, बोल्टनं शॅरीला त्याच्या प्रेयसीबद्दल सांगितले नाही.

 33 वर्षांच्या बोल्टने मार्च महिन्यात बेनेट लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचा खुलासा केला होता. ८ आॅलिम्पिक सुवर्णपदकांचा मानकरी असलेल्या बोल्टने १०० आणि २०० मीटर शर्यतीत विश्वविक्रम नोंदवला आहे. वायुवेगाने धावणारा खेळाडू अशी ख्याती असलेल्या बोल्टने २०१७ ला निवृत्ती घेतली.

Web Title: Usain Bolt begged British model for sexy pics two days before lover gave birth to their first child svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.