शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासा शाळेच्या स्वराजला दोन सुवर्णपदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 18:39 IST

सीबीएसई क्रीडा स्पर्धा : राष्ट्रीय स्पर्धेकरिता मिळाले वाइल्ड कार्ड

अमरावती : अभ्यासा इंग्लिश स्कूलचा तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी स्वराज गिरीने सीबीएसईमार्फत आयोजित स्केटिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकाविली. स्केटिंगमध्ये असा बहुमान मिळविणारा तो अमरावतीतून व सात वर्षे वयोगटात विदर्भातून पहिला खेळाडू असल्याची प्रतिक्रिया शाळेच्या प्राचार्य कांचनमाला गावंडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. सीबीएसई (दिल्ली) मार्फत बेळगाव (कर्नाटक) येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये देश-विदेशातील विद्यार्थी सहभागी होऊन त्यांचे क्रीडानैपुण्य दाखवतात. याच स्पर्धेत स्पीड स्केटिंग (५०० मीटर व १००० मीटर) या दोन्ही क्रीडाप्रकारांत स्वराजने या स्पर्धेत बाजी मारत सुवर्णपदके मिळविली. या स्पर्धेत नऊ झोनमधील उत्तम खेळाडू उतरले होते. यामध्ये गल्फ झोन, दुबई, नेपाळ, अंदमान निकोबार आदी ठिकाणांवरून खेळाडू सहभागी झाले होते. स्वराजचा स्केट स्पीड हा प्रति तास ४० किलोमीटर आहे. त्याने ५०० मीटर स्पर्धा ही ५८ सेकंदांत पूर्ण केली, तर १००० मीटर अंतर २ मिनिटे ४ सेकंदात पार केले. त्याला राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी वाइल्ड कार्ड मिळाले आहे. राष्ट्रीय स्केटिंग फेडरेशनचे निवडकर्ते पी.के. सिंह यावेळी उपस्थित होते.पत्रपरिषदेला अभ्यासा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष कुलभूषण गावंडे, प्राचार्य कांचनमाला पाटील, अ‍ॅकेडमिक हेड श्रीलता राव, प्रशिक्षक अनुज परतानी उपस्थित होते. स्वराजच्या यशाचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती