शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पाहुण्या संघाकडे उत्तर नाही : स्मिथ

By admin | Updated: December 28, 2014 00:58 IST

यजमान संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ५३० धावांची दमदार मजल मारली, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने व्यक्त केली.

मेलबोर्न : भारताकडे आॅस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांविरुद्ध कुठली योजना नाही, त्यामुळे यजमान संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ५३० धावांची दमदार मजल मारली, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथने व्यक्त केली.कारकीर्दीतील सर्वोत्तम १९२ धावांची खेळी करणारा स्मिथ म्हणाला, ‘खेळपट्टीवरच तळ ठोकल्यामुळे आनंद झाला आणि सर्व बाबी माझ्यासाठी अनुकूल होत्या. आम्हाला ५३० धावांची दमदार मजल मारता आली, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. पहिल्या डावात ही चांगली धावसंख्या आहे.’स्मिथने ब्रॅड हॅडिनच्या (५५) साथीने सहाव्या विकेटसाठी ११०, रॅन हॅरिससोबत (७४) आठव्या विकेटसाठी १०६ धावांची आणि नॅथन लियोनसोबत नवव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली.स्मिथ म्हणाला, ‘आमच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. खेळपट्टीवर दाखल झाल्यानंतर त्यांनी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मिशेल जॉन्सन आजही चांगला खेळत होता तर रॅन हॅरिसने शानदार फलंदाजी केली. भारताकडे आम्हाला रोखण्याचे उत्तर नव्हते. आमचे तळाचे फलंदाज चांगली कामगिरी करीत असल्यामुळे निश्चितच आनंद झाला. प्रतिस्पर्धी गोलंदाजांविरुद्ध त्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला.’स्मिथने यष्टिरक्षक हॅडिनची प्रशंसा करताना सांगितले ‘ब्रॅडने चांगली फलंदाजी केली. तो गोलंदाजावर वर्चस्व गाजवत होता. तो आज सुरुवातीपासून सकारात्मक होता. त्याने आखूड टप्प्याचा मारा चांगल्याप्रकारे खेळून काढला.’स्मिथचे द्विशतक हुकले असले तरी त्याला त्याचा खेद वाटत नाही. स्मिथ म्हणाला, ‘संघासाठी जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न करीत होतो. मी चहापानाच्या विश्रांतीला डाव घोषित करण्यास उत्सुक होतो, त्यामुळे अधिक धावा फटकाविण्यासाठी प्रयत्नशील होतो. माझ्या मते, ५३० ही चांगली धावसंख्या आहे.’ भारताने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात १ बाद १०८ धावांची मजल मारली. स्मिथ पुढे म्हणाला, ‘आम्ही आज प्रतिस्पर्धी संघाचे काही बळी घेण्यात यशस्वी ठरलो असतो तर आनंद झाला असता. सकाळच्या सत्रात प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यास प्रयत्नशील आहोत.’ (वृत्तसंस्था)