शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympic, Hockey : भारतीय पुरुष संघानं जपानला पाणी पाजलं, महिला संघानंही पहिल्या विजयासह आव्हान जीवंत ठेवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 16:36 IST

Tokyo Olympic, Hockey : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या साखळी फेरीत भारतीय पुरुष संघानं अखेरच्या सामन्यात यजमान जपानवर दणदणीत विजय मिळवला

Tokyo Olympic, Hockey : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या साखळी फेरीत भारतीय पुरुष संघानं अखेरच्या सामन्यात यजमान जपानवर दणदणीत विजय मिळवला. भारतानं या विजयासह १२ गुणांची कमाई करताना अ गटातील दुसरे स्थान पक्के केले आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर ब गटातील तिसऱ्या क्रमांकावरील संघाचे आव्हान असणार आहे. भारतीय महिला संघानंही आज पहिल्या विजयाची नोंद करताना उपांत्यपूर्व फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. 

Tokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधूचा रोमहर्षक विजय, जपानी खेळाडूला नमवून उपांत्य फेरीत प्रवेश

अ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघानं मध्यांतराला २-१ अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात १३व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगनं पेनल्टी कॉर्नवर गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १७व्या मिनिटाला गुरजंत सिंगनं मैदानी गोल केला. सिमरनजीत सिंगनं चेंडूवर ताबा राखताना चेंडू गोलपोस्टच्या दिशेनं भिरकावला, परंतु तो गोलखांब्यावर लागून माघारी परतला, नजिकच उभ्या असलेल्या गुरजंतनं गोल करून भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. जपानकडून १९व्या मिनिटाला पहिला गोल आला तो केंटो तनाकाच्या स्टीक्समधून. भारताचा गोलरक्षक पी आर श्रीजेश यानं जपानचे गोल अयशस्वी ठरवले त्यामुळे भारताला पहिल्या हाफमध्ये २-१ अशी आघाडी कायम राखता आली. ( India leading 2-1 against Japan at Half-time.) 

 चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळले, आसामच्या लवलिनानं संकटांवर मात करत ऑलिम्पिक पदक निश्चित केले!

दुसऱ्या सामन्यात जपानकडून कोटा वॅटानाबेनं ( ३३ मि.) गोल करताना बरोबरीचा आनंद साजरा केला, परंतु तो पुढच्याच मिनिटाला मावळला. समशेर सिंगनं पुढच्याच मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करून भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. भारतानं डी वर्तुळावर वर्चस्वपूर्ण खेळ करताना जपानवर दडपण कायम ठेवण्यात यश मिळवले होते. चौथ्या सत्रात जपाननं आक्रमक खेळावर भर देताना भारताच्या डी वर्तुळात कूच केली. सामना संपण्यास १० मिनिटांचा कालावधी शिल्लक करताना जपानचा खेळाडू गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु गोलरक्षक श्रीजेशनं डाईव्ह मारून त्यांना बरोबरी मिळवून दिली नाही. त्या काही सेकंदात श्रीजेशनं जपानचं तीन प्रयत्न हाणून पाडले. 

 ना टीम इंडियाचं नाव, ना तिचं; लढतीपूर्वी मेरी कोमला आयोजकांनी बदलायला लावली जर्सी, पण का?

५१व्या मिनिटाला निळकंट शर्मानं मैदानी गोल करून भारताची आघाडी ४-२ अशी मजबूत केली. त्यानंतर कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगच्या स्टीक्समधून आलेल्या चेंडूला गुरजंत सिंगन दिशा दाखवून ५-२ अशी दमदार आघाडी घेतली. गुरजंतचा हा सामन्यातील दुसरा गोल ठरला. ५९व्या मिनिटाला जपानकडून काजुमा मुराटानं गोल कडून पिछाडी ३-५ अशी कमी केली. 

महिला संघाचा पहिला विजयभारतीय महिला संघानं अ गटात शुक्रवारी पहिल्या विजयाची नोंद केली. नवनीत कौरनं ५७व्या मिनिटाला गोल करून भारताला १-० अशा फरकानं आयर्लंडवर विजय मिळवून दिला. चार सामन्यांतील भारताचा हा पहिला विजय आहे आणि अखेरच्या साखळी फेरीत त्यांना दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीच्या आशा पल्लवीत ठेऊ शकतो. (  Women's Hockey: India beat Ireland 1-0 in their penultimate Group match)   

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021HockeyहॉकीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघJapanजपान