Tokyo Olympic, Mary Kom : ना टीम इंडियाचं नाव, ना तिचं; लढतीपूर्वी मेरी कोमला आयोजकांनी बदलायला लावली जर्सी, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:54 PM2021-07-29T16:54:13+5:302021-07-29T16:58:59+5:30

Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असणारी बॉक्सर मेरी कोम हिला पराभवाचा धक्का बसला.

Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असणारी बॉक्सर मेरी कोम हिला पराभवाचा धक्का बसला.

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या इंग्रीट लोरेना व्हेलेंसिया व्हिक्टोरियाला कडवी टक्कर देऊनही मेरीला हा पराभव पत्करावा लागला. या पराभवाचे दुःख बाजूला ठेऊन ३८ वर्षीय मेरीन खिलाडूवृत्ती दाखवली आणि निकालानंतरच्या तिच्या कृतीचं सर्वांकडून कौतुक होत आहे.

महिलांच्या ४८-५१ किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेरीसमोर कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना व्हिक्टोरियाचे आव्हान होते. पहिल्या फेरीत इंग्रीटनं आक्रमक खेळ करताना ४-१ अशी बाजी मारली.

मेरीनं डिफेन्सिव्ह खेळावरच भर दिला. दुसऱ्या फेरीत मेरीकडून पलटवार झाला. जबरदस्त पदलालीत्य अन् जोरदार ठोसे मारून मेरीनं प्रतिस्पर्धीला बॅकफूटवर पाठवले. मेरीनं या फेरीत ३-२ अशी बाजी मारली.

तिसऱ्या फेरीत कडवी टक्कर झाली. पण कोलंबियाची खेळाडू दमलेली पाहायला मिळाली. मेरीच्या आक्रमकतेसमोर तिला तग धरणे अवघड झाले. मेरीनं तिसऱ्या फेरीत ३-२ अशी बाजी मारली, परंतु सर्वाधिक गुणांच्या शर्यतीत कोलंबियाची खेळाडू वरचढ ठरली अन् तिला ३-२ असे विजयी घोषित केले गेले.

या सामन्यापूर्वी मेरीला आयोजकांनी जर्सी बदलण्यास सांगितले होते. त्यामुळे रिंगमध्ये मेरीला ब्लँक जर्सी घालून उतरावे लागले. त्यामुळे तिच्या जर्सीवर ना टीम इंडियाचे नाव होते, ना तिचे स्वतःचे...

मेरी जेव्हा रिंगमध्ये दाखल होण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली तेव्हा तिनं 'Mary Kom' असं लिहिलेली जर्सी परिधान केली होती, परंतु आयोजकांच्या म्हणण्यानुसार जर्सीवर फक्त पहिलं नाव असायला हवं. त्यामुळे तिला ती बदलावी लागली आणि ती ब्लँक जर्सीसह रिंगवर उतरली. ( Did you know | Mary Kom was asked to change her jersey right before the bout. The jersey said 'Mary Kom' but the organisers said only the first name is to be there. She was given a jersey with a blank. )

मेरीकोमनं सहावेळा जागतिक स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. पदकाची दावेदार मानली जाणारी मेरीकोम चार मुलांची आई आहे. त्यातील दोन मुले जुळी. एका मुलाला २०१३ ला जन्म दिला. २०१८ ला मेरीकोमने मुलगी दत्तक घेतली.