Big News : भारतीय हॉकी महिला संघाला ऐतिहासिक उंची गाठून दिल्यानंतर रिअल लाईफमधील 'कबीर खान'नं सोडलं प्रशिक्षकपद! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 06:27 PM2021-08-06T18:27:43+5:302021-08-06T18:28:48+5:30

Tokyo Olympic 2020 : Sjoerd Marijne steps down  टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं ऐतिहासिक कामगिरी केली.

Tokyo Olympic 2020 : Sjoerd Marijne steps down as India women's hockey team coach   | Big News : भारतीय हॉकी महिला संघाला ऐतिहासिक उंची गाठून दिल्यानंतर रिअल लाईफमधील 'कबीर खान'नं सोडलं प्रशिक्षकपद! 

Big News : भारतीय हॉकी महिला संघाला ऐतिहासिक उंची गाठून दिल्यानंतर रिअल लाईफमधील 'कबीर खान'नं सोडलं प्रशिक्षकपद! 

Next

Tokyo Olympic 2020 : Sjoerd Marijne steps down  टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. शुक्रवारी झालेल्या कांस्यपदकाच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. ग्रेट ब्रिटनविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाला ४-३ असा पराभव पत्करावा लागला.  ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने ३-२ अशी आघाडी घेतली, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल करत ग्रेट ब्रिटनने हा सामना ४-३ असा फरकाने जिंकला. भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय महिलांची १९८०नंतरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. 

१९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सहा संघांमध्ये भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहिला होता. त्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी भारतीय महिला २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळल्या, परंतु त्या १२व्या स्थानावर राहिल्या. टोकियोत मात्र सलग तीन सामने गमावल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या भारतीय महिला संघाला अर्जेंटिनाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. कांस्यपदकाच्या लढतीत ग्रेट ब्रिटनला खेळाडूंनी कडवी झुंज दिली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिज्ने यांनी राजीनामा दिला.
 


कांस्यपदकाच्या लढतीनंतर मरिज्ने म्हणाले, भारतीय महिला हॉकी संघासोबतचा हा माझा शेवटचा सामना होता. '' २०१७ मध्ये डच प्रशिक्षकानं महिला संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली. मरिज्ने यांनी ट्विट केले की,''आम्ही पदक जिंकू शकलो नाही, परंतु माझ्यामते आम्ही त्यापेक्षा काहीतरी अधिक जिंकलो आहोत. भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी आम्ही करून दाखवली आणि अनेक मुलींना प्रेरणादायी कामगिरी केली. स्वप्न पूर्ण होतात. त्यासाठी मेहनत करण्याची आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवण्याची गरज आहे, हे आम्ही अनेक मुलींना शिकवले.''  

 

Web Title: Tokyo Olympic 2020 : Sjoerd Marijne steps down as India women's hockey team coach  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.