Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : ३-९ अशा पिछाडीवरून रवी कुमार दहियाची मुसंडी; बघा कशी सोडवली प्रतिस्पर्धीची मगरमिठी, Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:13 PM2021-08-04T16:13:45+5:302021-08-04T16:18:52+5:30

Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात भारताच्या रवी कुमार दहियानं अंतिम फेरीत प्रवेश करून ...

Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : What a dramatic turn around win by Ravi Kumar Dahiya,  was 3-9 down but did not give up, Video  | Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : ३-९ अशा पिछाडीवरून रवी कुमार दहियाची मुसंडी; बघा कशी सोडवली प्रतिस्पर्धीची मगरमिठी, Video 

Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : ३-९ अशा पिछाडीवरून रवी कुमार दहियाची मुसंडी; बघा कशी सोडवली प्रतिस्पर्धीची मगरमिठी, Video 

Next

Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात भारताच्या रवी कुमार दहियानं अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविला. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यानं झाकिस्तानच्या नुरीस्लॅम सानायेव्ह याची कडवी झुंज मोडून काढली. रवी कुमारनं जोरदार कमबॅक करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१२नंतर ऑलिम्पिकमधील भारताचे हे कुस्ती प्रकारातील पहिलेच पदक आहे. ( Silver medal assured! Ravi Dahiya first Indian since Sushil in 2012 to enter the wrestling finals in Olympics) 


 रवी कुमारनं पहिल्या दोन मिनिटांत उत्तम बचावात्मक खेळ केला. पण, कझाकच्या खेळाडूनं पहिला गुण घेतला. त्यानंतर रवीनं मजबूत पकड करत दोन गुण घेत आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांच्या खेळात रवी कुमारनं २-१ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रातील पहिल्याच मिनिटात नुरीस्लॅमनं अँकर लेग ( मगर पकड) करत ८ गुण कमावले अन् ९-३ अशी भक्कम आघाडी घेतली. पुढच्या मिनिटाला रवी कुमारनं कझाकिस्तानच्या खेळाडूला रिंग बाहेर फेकून ३ गुण घेत पिछाडी ५-९ अशी कमी केली. कझाकिस्तानचा खेळाडू जखमी झालेला पाहायला मिळाला, परंतु प्राथमिक उपचार घेत तो पुन्हा मॅटवर परतला. रवीनं जबरदस्त आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूची पाठ मॅटवर टेकवून ४ गुण घेतले. अन Victory by fall नियमानुसार रवीला विजयी घोषित करण्यात आले. 


पाहा व्हिडीओ...


भारताच्या दीपक पुनियाकडून अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या अपेक्षा होत्या, परंतु अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलर यानं पहिल्याच मिनिटाला धोबीपछाड करताना ९-० अशी भक्कम आघाडी घेतली आणि त्यानं १०-० असा एकहाती विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. दीपककडे अजूनही कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. ( Deepak Punia bows out against USA's Taylor III ) 

 

Web Title: Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : What a dramatic turn around win by Ravi Kumar Dahiya,  was 3-9 down but did not give up, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.