शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

"UPA सरकारकडून हवा तसा पाठिंबा नव्हता; ऑलिम्पिकमधील भारताच्या यशाचं श्रेय पंतप्रधान मोदींना!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 12:06 IST

Tokyo Olympic 2020 : भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली.

Tokyo Olympic 2020 : भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१२ मध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी कुस्तीपटू बजरंग पुनियानं कांस्यपदक जिंकले, तर भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. १२५ वर्षांत अॅथलेटिक्समधील भारताचे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीवर प्रतिक्रिया देताना माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार जे खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते, यांचे आभार मानले. ( former Indian athlete Anju Bobby George thanked PM Narendra Modi and his government's support behind India's marked improvement at the Olympics)

Neeraj Chopra : तुम्हाला माहित्येय का? गोल्डन बॉय नीरज चोप्रासाठी भारत सरकारनं खर्च केले किती कोटी?

२००४च्या अॅथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्ज लांब उडीत पाचव्या क्रमांकावर राहिली होती आणि तिनं वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना ६.८३ मीटर लांब उडी मारली होती. यावेळी अंजू बॉबी जॉर्ज यांनी अॅथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेतील दिवसांना उजाळा दिला. सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर बोलताना त्या म्हणाल्या, ''आमच्या काळात आपले क्रीडा मंत्री ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये पाहुणे म्हणून यायचे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर भारतात मोठा जल्लोष साजरा केला गेला, परंतु मंत्र्यांकडून त्याला फार महत्त्व दिले गेले नाही. तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी माझे अभिनंदन केले, त्यापलिकडे काहीच नव्हते.''

गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा झाला करोडपती; ३ तासांत १६.७५ कोटींचे रोख बक्षीस जाहीर, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

आता खेळाडूंना मिळत असलेले महत्त्व मिस करत असल्याचेही त्या म्हणाल्या. ''भारत सरकार खेळाडूंना खूप महत्त्व देत आहे. पदक जिंकल्यानंतर आपले पंतप्रधान स्वतः खेळाडूंना फोन करत आहेत. त्यामुळे खेळाडूंनाही ही संधी सोडावीशी वाटत नाही. भारतात काहीतरी मोठं होत आहे. मी याचा भाग नसल्यानं मी हे सर्व मिस करतेय,''असेही त्या म्हणाल्या.  देशातील सध्याची क्रीडा संस्कृतीबाबत बोलताना अंजू यांनी या सरकारनं ग्रासरूट ( खालच्या स्तरापासून) लेव्हलपासून सोयी सुविधा पुरवल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ते खूप सहकार्य करत आहेत. ते आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. प्रत्येक खेळाडूवर त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच रिझल्ट मिळत आहेत. ग्रासरूट लेव्हलपासून ते काम करत आहेत. त्यांच्याकडे दीर्घकालीन आराखडा आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण आतापासूनच २०२८ व २०३२च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आराखड्यावर काम करत आहेत. सिस्टम असेच काम करते. आता युवा खेळाडूंसाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. असाच पाठिंबा मिळत राहिला, तर भारत एक दिवस नक्की अव्वल क्रमांकावर असेल.''

भारतीयांची अविश्वसनीय कामगिरी; निरोप समारंभात डौलानं फडकला तिरंगा, जाणून घ्या मेडल टॅलीत कितव्या स्थानी!

स्वतः क्रीडापटू असलेले क्रीडा मंत्री आपल्याला मिळाले आणि हे ऑलिम्पिक यशामागचे एक कारण आहे. त्या म्हणाल्या,'' किरण रिजिजू ( माजी क्रीडा मंत्री) त्यांना खेळाची प्रचंड आवड होती आणि ते प्रत्येक खेळाडूला ओळखायचे.  आम्ही जेव्हा मॅसेज किंवा कॉल करायचो, ते मदतीसाठी उपलब्ध असायचे. नवीन क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर सह हेही खेळाडू आहेत आणि तेही चांगले काम करत आहेत. अशा प्रकारचा पाठिंबा मंत्र्यांकडून व सिस्टमकडून अपेक्षित आहे.'' 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंग