शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

यजमान देशांमध्ये आज वर्चस्वाची लढाई

By admin | Updated: February 28, 2015 01:21 IST

चारवेळा जेतेपदाचा मान मिळविणारा आॅस्ट्रेलिया आणि यावेळी जेतेपदाचा दावेदार मानला जाणारा न्यूझीलंड या परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान

आॅकलंड : चारवेळा जेतेपदाचा मान मिळविणारा आॅस्ट्रेलिया आणि यावेळी जेतेपदाचा दावेदार मानला जाणारा न्यूझीलंड या परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, शनिवारी लढत होणार आहे. विश्वचषक स्पर्धेचे संयुक्त यजमानपद भूषविणाऱ्या या दोन संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या लढतीत कोण सरशी साधणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दोन सख्ख्या शेजाऱ्यांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना मात्र रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे.या स्पर्धेत शानदार कामगिरी करीत असलेल्या न्यूझीलंड संघाने सलग तीन विजयाची नोंद केली आहे. हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता आॅस्ट्रेलियाने एक विजय मिळविला असून, एक लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाली. आॅस्ट्रेलियाने सलामी लढतीत इंग्लंडचा १११ धावांनी पराभव केला होता. मर्सिया वादळामुळे बांगलादेशविरुद्धच्या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळविण्याचे स्वप्न त्यांना साकार करता आले नाही. आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये ‘अंडरडॉग्ज’ म्हणून सहभागी होणाऱ्या न्यूझीलंड संघाला यावेळी मायदेशातील वातावरणात प्रबळ दावेदार मानले जात आहे. आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन म्हणाले, ‘ही लढत उभय संघांसाठी आव्हान आहे. मॅक्युलम आमच्यावर वर्चस्व गाजविण्यास सज्ज आहे; पण आम्ही त्याच्याविरुद्ध काही योजना आखल्या आहेत. न्यूझीलंडने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून, लढत रंगतदार होईल. आमच्याविरुद्ध न्यूझीलंड संघ कसा खेळतो, याबाबत उत्सुकता आहे. ते आक्रमक खेळ करतील, अशी आशा आहे.’ (वृत्तसंस्था)