Tokyo Olympics 2021: ऐनवेळी पिस्तूलने दगा दिला, अन् मनू भाकरचा पदकावरील निशाणा चुकला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 08:42 AM2021-07-25T08:42:41+5:302021-07-25T08:45:18+5:30

Tokyo Olympics 2021 LIVE Updates: महिलांच्या नेमबाजीमध्ये देशाला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या युवा मनू भाकर हिला १० मीटर एअर पिस्तूल गटात अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.

At that time, the pistol betrayed, and Mannu Bhakar missed the mark on the medal | Tokyo Olympics 2021: ऐनवेळी पिस्तूलने दगा दिला, अन् मनू भाकरचा पदकावरील निशाणा चुकला

Tokyo Olympics 2021: ऐनवेळी पिस्तूलने दगा दिला, अन् मनू भाकरचा पदकावरील निशाणा चुकला

Next

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रविवारची सकाळ  निराशाजनक ठरली. महिलांच्या नेमबाजीमध्ये देशाला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या युवा मनू भाकर (Manu Bhaker ) हिला १० मीटर एअर पिस्तूल गटात अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. ( Tokyo Olympics 2021 LIVE Updates) मात्र मनू भाकर हिला ज्या कारणामुळे पदकाने हुलकावणी दिली ते पाहून क्रीडाप्रेमी दु:खी झाले आहेत. (10m Air Pistol Women's qualification: Manu Bhaker and Yashaswini Singh Deswal fail to make it to medal round )

युवा नेमबाज मनू भाकर हिने पात्रता फेरीमध्ये जोरदार सुरुवात केली होती. तिचा फॉर्म पाहून ती सहजपणे अंतिम फेरी गाठणार असे दिसत होते. मात्र मोक्याच्या क्षणी मनूकडील पिस्तूलामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे निर्धारित वेळेतील पाच मिनिटे वाया गेली. त्यानंतर ती पुन्हा निशाणा साधण्यासाठी आली तेव्हा तिच्यावर वेळेचा दबाव स्पष्टपणे दिसून आला. अखेरीस ती अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली.

पिस्तूलामध्ये झालेला बिघाड दुरुस्त झाल्यानंतर मनूने पुनरागमन करण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला. फ्रान्स आणि युक्रेनच्या नेमबाजांसोबत तिचा शूट ऑफसुद्धा झाला, पण पिस्तूलाप्रमाणेच नशिबानेही तिची साथ दिली नाही. अखेरीच मनूला आलेल्या अपयशामुळे भारताच्या पदकाच्या आशेवर पाणी फिरले. 

दुसरीकडे मनूबरोबरच या गटात सहभागी असलेली भारताची अन्य नेमबाज यशस्विनी सिंह देशवाल हिलाही अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी होती. मात्र अखेरच्या क्षणी तिला अपयश आले. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी पहिल्या आठ नेमबाजांमध्ये स्थान मिळवणे आवश्यक असते. मात्र मनू १२ व्या आणि यशस्विनी १३ व्या स्थानावर राहिली. अंतिम फेरी गाठण्यासाठी मनूला २ तर यशस्विनीला ३ गुण कमी पडले.

दरम्यान, रियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने यंदाच्या ऑलिम्पिकमधील आपल्या अभियानाची दमदार सुरुवात केली आहे. आज सकाळी झालेल्या पहिल्या फेरीतील लढतीत सिंधूने इस्राइलच्या केसेनिया पोलिकारपोव्हाचा २१-७, २१-१० असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत पुढच्या फेरीमध्ये आगेकूच केली.
 

Web Title: At that time, the pistol betrayed, and Mannu Bhakar missed the mark on the medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app