शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

Controversies Of CWG 2022: या ४ वादांमुळे राष्ट्रकुल स्पर्धेला लागला वाईट डाग; भारताला गमवावे लागले १ सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 12:34 IST

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ ची सोमवारी सांगता झाली असून ७२ देशातील ५००० हून अधिक ॲथलीट विविध खेळांमध्ये सहभागी झाले होते.

बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022) ची सोमवारी सांगता झाली असून ७२ देशातील ५००० हून अधिक थलीट विविध खेळांमध्ये सहभागी झाले होते. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरले. तब्बल ७२ देशातील खेळाडू एका मोठ्या व्यासपीठावर जमल्याने स्पर्धेने अवघ्या जगाला आकर्षित केले होते. मात्र या स्पर्धेतील काही वादांमुळे स्पर्धेला एक वाईट डाग देखील लागला आहे. यातील काही वादांमध्ये भारतीय संघांचा देखील समावेश होता. भारतीय हॉकी महिलांना तर या वादामुळे सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले होते. 

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कोरोना संक्रमित असतानाही मैदानातभारत आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट सामन्यात एक ऑस्ट्रेलियन खेळाडू कोरोना संक्रमित असताना देखील मैदानात उतरला होता. कोरोना संक्रमित असलेल्या खेळाडूंना खेळण्यास परवानगी नसताना देखील ऑस्ट्रेलियाने रडीचा डाव खेळला. बर्गिंहॅम २०२२ च्या आयोजन समितीने, आयसीसीने, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय क्रिकेट मंडळांनी ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर तालिया मॅक्ग्राला कोरोना पॉझीटिव्ह असताना देखील भारताविरूद्धच्या फायनलच्या सामन्यात खेळू दिले. त्यामुळे भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या आरोग्यास धोका निर्माण झाला.

महिला हॉकी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा रडीचा डावऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामधील उपांत्येफेरीचा सामना १-१ च्या बरोबरीत समाप्त झाला होता. यानंतर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी शूट आऊट सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३-० ने मोठा विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या पराभवामध्ये पंचाचा देखील मोठा वाटा राहिला. शूट-आऊटमध्ये भारताने पहिला गोल वाचवला होता, पण नंतर वेळ सुरूच झाली नसल्याचे सांगण्यात आले आणि ऑस्ट्रेलियाला आणखी एक संधी देण्यात आली. यानंतर भारतीय संघ पिछाडीवर गेला. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या वाघिणींना पराभव पत्करावा लागला होता. यावर विविध स्तरातून टीका करण्यात आली होती. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने देखील यावर नाराजी व्यक्त केली होती. या पराभवामुळेच भारतीय महिला सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाल्या होत्या.

लवलीनाचे प्रशिक्षक ओळखण्यावरून वादबर्गिंहॅम गावात मर्यादीत संख्येने खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना आतमध्ये येण्यास परवानगी दिली होती. लवलीना बोरगोहेनचे प्रशिक्षक संध्या गुरूंग यांना यावेळी वेगळी ओळख देण्यात आली, त्यामुळे त्यांना गावामध्ये प्रवेश करू दिला नाही. लवलीनाने मानसिक छळ केल्याचा आरोप करत सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित केला. अखेर बॉक्सिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक भास्कर भट्ट यांना त्याच्या प्रशिक्षकाला मान्यता द्यावी लागली. 

थलीट्स गाव नसल्याने खेळाडू नाराजबर्गिंहॅम २०२२ च्या आयोजकांकडे सर्व खेळाडूंना सामावून घेण्यासाठी एकही थलीट्स गाव नव्हते. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या खेळांच्या आधारे एकूण पाच लहान गावात ठेवण्यात आले. तसेच काही खेळाडूंना हे सोयीचे देखील होते कारण त्यांना गावापासून मैदानापर्यंत जाण्यासाठी जास्त प्रवास करावा लागत नव्हता. खेळाडूंसाठी मोठ्या गावाचे वातावरण पदके जिंकूनही चांगले नव्हते, जे काही खेळाडूंसोबत झालेल्या घटनांमुळे दिसून आले. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाEnglandइंग्लंडIndiaभारतGold medalसुवर्ण पदकAustraliaआॅस्ट्रेलियाIndian Women's Cricket Teamभारतीय महिला क्रिकेट संघHockeyहॉकी