शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘पदार्पणाच्या वेळी यशाबाबत साशंकता होती’

By admin | Updated: November 8, 2014 03:23 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळजवळ सर्वच विक्रमांवर नाव कोरणाऱ्या सचिन तेंडुलकरने ज्या वेळी वकार युनूस व वसीम अक्रम यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा समावेश

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळजवळ सर्वच विक्रमांवर नाव कोरणाऱ्या सचिन तेंडुलकरने ज्या वेळी वकार युनूस व वसीम अक्रम यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा समावेश असलेल्या पाकिस्तान संघाविरुद्ध १९८९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्या वेळी तो घाबरलेला होता. सचिनला त्या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याच्या क्षमतेवर साशंकता होती. प्रकाशित झालेले आत्मचरित्र ‘प्लेइंग इट माय वे’मध्ये सचिनने खुलासा केला आहे. कसोटी क्रिकेटमधील पहिला डाव किती कठीण होता, याचा सचिनने उल्लेख केला आहे. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दडपणाची कल्पना असलेल्या तेंडुलकरने सियालकोटमध्ये चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान वकारच्या गोलंदाजीवर कसा रक्तबंबाळ झालो याचे वर्णन केले आहे. याबाबत सचिनने म्हटले आहे, ‘मी धावांचे खाते उघडले होते. त्यानंतर वकारने बाउन्सर केला. माझ्या अंदाजापेक्षा हा चेंडू अधिक उसळला आणि माझ्या हेल्मेटच्या फ्लॅपवरून नाकावर आदळला. त्यानंतर माझे डोके जड झाले आणि मला काहीच दिसत नव्हते. चेंडू स्लिपमध्ये गेला आणि मी चेंडू कुठे गेला हे शोधत होतो. त्याच वेळी मला माझ्या शर्टवर रक्त दिसले. मी या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना जावेद मियांदादच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटले. मियांदाद म्हणाला, ‘अरे तुला तर आता रुग्णालयात जावे लागणार, तुझे नाक मोडले आहे.’ प्रेक्षक गॅलरीतील एका बॅनरवर लिहिले होते, ‘बच्चा घर जाकर दूध पिके आ’ यामुळे मी अधिक निराश झालो होतो. सचिनने कराची कसोटीच्या आठवणीचा उल्लेख करताना म्हटले की, ‘कराची कसोटीमध्ये १६ वर्षांचा एक मुलगा केवळ घाबरलेला होता, असे नाही, तर त्या वेळी त्याला भारत-पाक क्रिकेटमधील भावनेचा उद्रेकही अनुभवयाला मिळाला. (वृत्तसंस्था)