शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकर विघ्नेशचे रौप्य पदक

By admin | Updated: November 4, 2016 04:01 IST

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात ठाणेकर विघ्नेश देवळेकरने रोहन कपूरच्या साथीने अंतिम फेरीत धडक मारली

मुंबई : नुकत्याच बहारीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात ठाणेकर विघ्नेश देवळेकरने रोहन कपूरच्या साथीने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, मोक्याच्यावेळी झालेल्या चुकांचा फटका बसल्याने विघ्नेश - रोहन यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात विघ्नेश-रोहन जोडीला सोव्हिएत रशियाच्या इव्हेगनीज ड्रीमन-डेनिस ग्रेचेव्ह जोडीकडून १८-२१,१७-२१ असा पराभव पत्कारावा लागला. ठाणे महपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीत विघ्नेश प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहे. स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केलेल्या विघ्नेश - रोहन यांनी इंडोनेशियाच्या जाफर इब्राहिम आणि हरी सेतीवान जोडीचा सरळ गेममध्ये २१-१५, २१-१८ असा पराभव करुन विजयी सुरुवात केली. यानंतर भारतीय जोडीने उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या अदनान इब्राहिम-वाहिद तक्वेऊद्दीन जोडीवर २१-१२, १९-२१, २१-९ अशी मात करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात मात्र, विघ्नेश-रोहन यांना मोक्याच्यावेळी केलेल्या चुकांचा फटका बसला. इव्हेगनीज - डेनिस यांच्या वेगवान खेळापुढे दडपणाखाली आल्यानंतर भारतीय जोडीकडून नेट्सजवळ चुका झाल्याने त्यांना अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पोलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विघ्नेशने आपले पहिले आंतरराष्ट्रीय कांस्य पदक पटकावले होते. आगामी बांग्लादेश आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली विघ्नेशने तयारी सुरु केली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)