शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

टेनिस कोर्टमध्येच तिने कात्रीने कापली स्वतःची वेणी

By admin | Updated: October 26, 2016 12:56 IST

रशियाची टेनिसस्टार स्वेतलाना कुझनेत्सोवाने डब्ल्यूटीएचा ( वुमेन टेनिस असोसिएशन) अंतिम सामना सुरू असतानाच कोर्टमध्ये स्वतःची वेणी कापली.

ऑनलाइल लोकमत 

सिंगापूर, दि. 26 - रशियाची टेनिसस्टार स्वेतलाना कुझनेत्सोवाने डब्ल्यूटीएचा ( वुमेन टेनिस असोसिएशन) अंतिम सामना सुरू असतानाच कोर्टमध्ये स्वतःची वेणी कापली. सिंगापूरमध्ये अंतिम सामना सुरू असताना ही घटना घडली आहे. अंतिम सामन्यादरम्यान स्वेतलाना विरोधी स्पर्धक आणि गतवर्षाची विजेती पोलंडची एग्निएझ्का रोद्वान्स्काहून 1-2नं पिछाडीवर होती. जिंकण्याचेच उद्देश डोळ्यासमोर ठेवलेल्या स्वेतलाना यावेळी अंपायरकडे एक ब्रेक देण्याची विनंती केली, यानंतर कोर्टवर कात्री मागवून वेणीचा काही भाग तिने तिथल्या तिथे कापला.

स्वेतलानाने कोर्टातच स्वतः केस कापत असल्याचे पाहून सर्वजण हैराण झाले. यानंतर जरासाही क्षणाचा विलंब न लावता तिने पुन्हा खेळ सुरू केला आणि सर्वांना आश्चर्यचकित करत तिने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले, आणि रोद्वान्स्काला 7-5, 1-6 आणि 7-5 अशा सरळ सेटमध्ये नमवत विजेतेपदाला गवसणी घातली. 

 

सामन्यानंतर केस कापण्याबाबत विचारले असता तिने सांगितले की, ' मी जेव्हा जेव्हा शॉट मारण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा माझ्या वेणीचे टोक माझ्या डोळ्यात खुपत होते, याचा मला खेळताना त्रास होत होता. त्यावेळी मी विचार केला मला आता महत्त्वाचे काय आहे केस की सामना?, मात्र केस तर मी नंतरदेखील वाढू शकते. त्यामुळे यावर जास्त विचार करण्यात वेळ न घालवता, मी तिथल्या तिथे केस कापण्याचा निर्णय घेतला', असे स्वेतलाना सांगितले.