सायना नेहवालच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

By Admin | Updated: August 21, 2016 01:15 IST2016-08-21T01:15:21+5:302016-08-21T01:15:21+5:30

पायदुखीमुळे त्रस्त झालेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात शनिवारी सकाळी अर्थोस्कॉपिक शस्त्रक्रिया करण्यात

Surgery on the knees of Saina Nehwal | सायना नेहवालच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

सायना नेहवालच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

मुंबई: पायदुखीमुळे त्रस्त झालेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात शनिवारी सकाळी अर्थोस्कॉपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती स्थिर असून पुढचे काही दिवस तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सायनाचा उजवा पाय दुखत होता. उजव्या पायाच्या गुडघ्याच्या वाटीजवळचे हाड थोडे सरकले असल्यामुळे तिला वेदना होत होत्या. त्यामुळे शुक्रवारी तिला कोकिलाबेन रुग्णालयाच्या स्पोर्ट्स मेडिसिन विभागात दाखल केले होते. काही तपासण्या केल्यावर विभागप्रमुख डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी तिच्यावर अर्थोस्कॉपिक शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉ. परडीवाला यांनी सांगितले. सायना हिच्या सांध्याला झालेल्या दुखापतीमुळे गुडघ्याच्या वाटीपासून एक छोटेसे हाड सरकले होते. त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. (प्रतिनिधी)

Web Title: Surgery on the knees of Saina Nehwal