सुरेश रैना आजारी

By Admin | Updated: October 14, 2016 01:09 IST2016-10-14T01:09:17+5:302016-10-14T01:09:17+5:30

वर्षभरानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना व्हायरलमुळे आजारी पडला आहे. तापामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध पहिला वन-डे खेळणार नाही

Suresh Raina ill | सुरेश रैना आजारी

सुरेश रैना आजारी

नवी दिल्ली : वर्षभरानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना व्हायरलमुळे आजारी पडला आहे. तापामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध पहिला वन-डे खेळणार नाही.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार रैना साथीच्या आजाराने फणफणत असून, त्याच्यावर वैद्यकीय पथक उपचार सुरू आहेत. न्यूझीलंडविरुद्ध तो पहिला वन डे खेळू शकणार नाही. आॅक्टोबर २०१५ नंतर रैना पहिला वन डे खेळण्यास इच्छुक होता. पहिला सामना १८ आॅक्टोबर रोजी धर्मशाळा येथे खेळला जाईल. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ३-० ने न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिले होते.
डावखुरा फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या रैनाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून संघाबाहेर काढण्यात आले होते. नंतर झिम्बाब्वे दौऱ्यासाठीदेखील त्याच्या नावाचा विचार झाला नव्हता. यानंतर अमेरिकेत वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या दोन्ही टी-२० सामन्यांसाठी त्याला संघात घेण्यात आले नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Suresh Raina ill