शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
2
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
3
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
5
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
6
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
7
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
8
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
9
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
10
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
11
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
12
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
13
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
14
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
15
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
16
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
17
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
18
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
19
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
20
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश कलमाडी, चौटाला यांचे ‘पुनर्वसन’

By admin | Updated: December 28, 2016 03:06 IST

राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चर्चेत राहिलेल्या सुरेश कलमाडी यांना मंगळवारी भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या (आयओए) वार्षिक आमसभेमध्ये आजीवन अध्यक्ष

चेन्नई : राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चर्चेत राहिलेल्या सुरेश कलमाडी यांना मंगळवारी भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या (आयओए) वार्षिक आमसभेमध्ये आजीवन अध्यक्ष बनविण्यात आले. आरोपांमुळे चर्चेत राहिलेले अन्य एक पदाधिकारी अभय सिंग चौटाला यांचीही आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आयओएच्या अधिकृत वेबसाईटनुसार कलमाडी व चौटाला यांच्यापूर्वी केवळ विजय कुमार मल्होत्रा यांना आयओएचे आजीवन अध्यक्ष बनविण्यात आले होते. ते २०११ आणि २०१२ मध्ये आयओएचे कार्यकारी अध्यक्षही होते.
कलमाडी १९९६ ते २०११ पर्यंत आयओएच्या अध्यक्षपदी होते. त्यांना २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारामध्ये समावेश असल्याच्या आरोपाखाली १० महिने तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते.
पुणे येथे जन्मलेले ७२ वर्षीय कलमाडी काँग्रेसचे माजी खासदार आहेत. ते २००० ते २०१३ या कालावाधीत आशियाई अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाचे अध्यक्षही होते. त्यांची गेल्या वर्षी आशियाई अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाच्या आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाचे २००१ ते २०१३ या कालावधीत सदस्य होते.
चौटाला डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत आयओएचे अध्यक्ष होते. त्या कालावधीत आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने निवडणुकीमध्ये आयओएला निलंबित केले होते. आरोपपत्र असलेल्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये उतरविल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. आयओएचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या निवडीला आयओसीने रद्द केले होते.
आयओएने घटनेमध्ये बदल करताना आरोप पत्र दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आयओसीने फेब्रवारी २०१४ मध्ये आयओएवरील निलंबन रद्द केले.
चौटाला यांची बॉक्सिंगची यापूर्वीची संघटना भारतीय अम्यॅच्युर बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर एआयबीएने (जागतिक बॉक्सिंग महासंघ) २०१३ मध्ये या संघटनेची मान्यता रद्द केली. अलीकडेच चौटाला यांची हरियाणा आॅलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या गटाला आयओएने मान्यता प्रदान केली आहे. (वृत्तसंस्था)

क्रीडामंत्री गोयल : निवड स्वीकारार्ह नाही
- सुरेश कलमाडी व अभय सिंग चौटाला यांची भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या (आयओए) आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याच्या निर्णयावर केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी नाराजी व्यक्त केली. या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करताना गोयल यांनी कारवाई करणार असल्याचे सांगितले.
- आपल्या निवास्थानी घाईघाईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत गोयल यांनी सांगितले की, ‘कलमाडी व चौटाला यांची आयओएच्या आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले. दोघेही भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांना सामोरे जात आहेत. याचा अहवाल मागण्यात येईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल. ’