शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सुपर सिरीजची अंतिम फेरी मोठा पल्ला

By admin | Updated: September 22, 2015 23:52 IST

दुखापतीमुळे तब्बल सात महिन्यांनी कोर्टवर उतरताना पुनरागमन करणे खूप आव्हानात्मक होते. सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणे हे एक स्वप्न होते

नवी दिल्ली : दुखापतीमुळे तब्बल सात महिन्यांनी कोर्टवर उतरताना पुनरागमन करणे खूप आव्हानात्मक होते. सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणे हे एक स्वप्न होते. कोरिया ओपन सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत खेळणे माझ्यासाठी खूप मोठा पल्ला आहे, असे भारताचा बॅडमिंटनपटू अजय जयराम याने सांगितले. नुकत्याच झालेल्या कोरिया ओपन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावल्यानंतर त्याने आपले मत व्यक्त केले.अंतिम फेरीत जयरामला चीनच्या बलाढ्य व जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चेन लाँगविरुद्ध पराभूत व्हावे लागले. मी लहानपणापासून पीटर गेड, लिन डैन आणि तौफिक हिदायत यांचा खेळ पाहत आलो. सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यात खेळणे माझे स्वप्न होते, असेही जयरामने सांगितले.खांद्यावर शस्त्रक्रिया करून पुन्हा खेळण्यास सुरुवात केलेला जयराम पुनरागमनाविषयी म्हणाला, की दुखापतीतून सावरणे सोपं नसतं. सुरुवातीला मी चार महिन्यांनंतर पुन्हा खेळू शकेल असे वाटले होते. मात्र रिहॅबिलिटेशन सर्वांत आव्हानात्मक होते. या वेळी अनेक चढ-उतार आले आणि अनेकदा मी स्वत:च्या तंदुरुस्तीबाबत चिंतीत होतो. या वेळी मला पुनरागमन आणि चांगल्या प्रदर्शनासाठी प्रोत्साहन मिळाले आणि परिवारासह वेळ घालवल्याचा जास्त आनंद मिळाला.कोरिया ओपन स्पर्धेत सुरुवातीपासून चमकदार खेळ केल्यानंतर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर जयराम म्हणाला, की स्पर्धेची सुरुवात चांगली झाली. जपान ओपनमध्ये मी विक्टर एक्सेलसन विरुद्ध पराभूत झालो होतो. मात्र कोरिया ओपनमध्ये पहिल्याच सामन्यात त्याला नमवल्याने माझा आत्मविश्वास उंचावला. त्यानंतर मला दोन वेळा पराभूत केलेल्या तियेन चेनलादेखील पराभूत केल्याने माझा आत्मविश्वास आणखी वाढला. रँकिंगविषयी चिंता नाही...सध्या जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानी असलेल्या जयरामने रँकिंगविषयी चिंतित नसल्याचे सांगितले. मी माझ्या जागतिक रँकिंगविषयी चिंतित नसून पुढील वर्षी मी अव्वल २५ खेळाडूंमध्ये पोहोचेल. मात्र मी सातत्यपूर्ण कमगिरीवर लक्ष केंद्रित केले असून, यापुढे नियमितपणे क्वार्टर फायनल व सेमीफायनल गाठेन, असा विश्वास जयरामने व्यक्त केला.(वृत्तसंस्था)