शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

सुदीरमन कप बॅडमिंटन; भारताची लढत कोरियासोबत

By admin | Updated: May 13, 2015 01:22 IST

सायना नेहवाल व के. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखालील भारतीय बॅडमिंटन संघाला बुधवारी सुदीरमन कप स्पर्धेत ‘ग्रुप वन डी’च्या महत्त्वाच्या लढतीत

डोंगुआन : सायना नेहवाल व के. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखालील भारतीय बॅडमिंटन संघाला बुधवारी सुदीरमन कप स्पर्धेत ‘ग्रुप वन डी’च्या महत्त्वाच्या लढतीत तीन वेळच्या चॅम्पियन कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारताला सोमवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत मलेशियाविरुद्ध ३-२ नी पराभव स्वीकारावा लागला. भारताला बुधवारच्या लढतीत विजय मिळविणे आवश्यक आहे. या लढतीत पराभव स्वीकारावा लागला, तर भारताचे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्याचे स्वप्न भंगणार आहे. भारतीय संघासाठी या लढतीत विजय मिळविणे सोपे नाही. कारण, कोरिया संघात जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावरील वान हो सोन व महिला विभागात सातव्या क्रमांकावर असलेली सुंग जि ह्यून यांचा समावेश आहे. श्रीकांत व सायना यांनी एकेरीच्या लढतीत विजय मिळविला, तर ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकविजेती जोडी अश्विनी पोनप्पा व ज्वाला गुट्टा यांच्यापुढे महिला दुहेरीत जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेली जोडी शिन सियुंग चान व ली सो ही यांचा पराभव करण्याचे आव्हान असेल. पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला संघ ली योंग दाय व यू सियोंग आणि आठवे मानांकनप्राप्त सुंग ह्यून व किम हा यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.एकेरीच्या लढती चुरशीच्या होतील. श्रीकांतने दोनदा वानविरुद्ध सरशी साधली आहे; पण गेल्या तीन सामन्यांमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला. त्याला सोमवारी ली चोंग वेईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. महिला एकेरीत आॅलिम्पिक कांस्यपदकविजेत्या सायनाची ह्युनविरुद्धची कामगिरी ५-१ अशी आहे. सोमवारी सायनाला जागतिक क्रमवारीत ५६व्या स्थानावर असलेल्या ती जिंग यीविरुद्धच्या लढतीत घाम गाळावा लागला होता. (वृत्तसंस्था)